पुणे /येरवडा : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींची पॅरोलवर येरवडा कारागृहातून सुटका झाल्यावर हुल्लडबाजी करत जाणार्या ८ जणांना विश्रांतवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल, पाच काडतुसासह ४ आलीशान कार जप्त केल्या आहेत. गंभीर बाब म्हणजे त्यात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचार्यांचा समावेश असल्याने पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.पोलीस कर्मचारी शरीफ बबन मुलाणी (वय ३६ रा. इंद्रायणीनगर, भोसरी) त्याच्यासह आझाद शेखलाल मुलाणी (वय ३०, रा. तळवडे चिखली), आदेश दिलीप ओकाडे (वय २१ रा. सुयोग नगर, निगडी), मुबारक बबन मुलाणी (वय ३८ रा. मोरेवस्ती चिखली) संदीप किसन गरुड (वय ४० रा. तळेगाव दाभाडे), हुसेन जाफर मुलाणी (वय ४३) सिराज राजू मुलाणी (वय २२) विनोद नारायण माने (वय २६ तिघेही रा. कोळवण, मुळशी) यांच्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पुण्यात पॅरोलवर सुटल्यानंतर आरोपींकडून हुल्लडबाजी, ८ आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 08:44 IST
गंभीर बाब म्हणजे त्यात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचार्यांचा समावेश असल्याने पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यात पॅरोलवर सुटल्यानंतर आरोपींकडून हुल्लडबाजी, ८ आरोपींना अटक
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}