चिमुकलीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडला, बलात्कारानंतर हत्या झाल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 18:17 IST2022-05-25T17:20:04+5:302022-05-25T18:17:45+5:30
DeadBody Found :या घटनेची माहिती मिळताच पोलीस मुख्यालयातील एसएसपी जयप्रकाश सिंह, ग्रामीण पोलीस अधीक्षक सत्यपाल सिंह फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी पोहोचले, त्यांनी संपूर्ण घटना पाहिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

चिमुकलीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडला, बलात्कारानंतर हत्या झाल्याचा संशय
इटावा : उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील चौबिया पोलीस स्टेशन हद्दीतील कौबली गावात एका ७ वर्षीय निष्पाप मुलीचा मृतदेह सापडला आहे. या मुलीवर बलात्कारानंतर खून झाल्याची शक्यता आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस मुख्यालयातील एसएसपी जयप्रकाश सिंह, ग्रामीण पोलीस अधीक्षक सत्यपाल सिंह फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी पोहोचले, त्यांनी संपूर्ण घटना पाहिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
एसएसपी जयप्रकाश सिंह यांनी निष्पाप मुलीचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले की, चिमुकलीचा मृतदेह सापडल्यानंतर तो तपासणीसाठी मुख्यालयात पाठवण्यात आला आहे. पॅनेलद्वारे मृतदेहाची तपासणी करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास करून दोषीला पकडण्यासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली आहेत.
काबुली गावातील एका भात गिरणीच्या मागे या निष्पाप मुलीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडला आहे, ते पाहता या मुलीवर बलात्कार झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, सद्यस्थितीत कोणीही पोलीस अधिकारी याची खातरजमा करण्यास तयार नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर याची माहिती स्पष्ट होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
प्रत्यक्षात, ज्या मुलीचा मृतदेह सापडला आहे, ती काल संध्याकाळी ७ वाजल्यापासून घरातून बेपत्ता होती. सुरुवातीला गावातील लोकांनी मुलीचा मृतदेहास हात लावू दिला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यास होकार दिला. निरागस मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती सायंकाळी उशिरा समजताच तिच्या कुटुंबीयांसह गावातील लोकांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. रात्रभर शोध घेऊनही तिचा शोध लागला नाही. त्यानंतर बुधवारी सकाळी सातच्या सुमारास शोधाशोध सुरू असताना एसएस पॅडी मिलच्या मागे अर्धनग्न अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळून आला.