शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

राज्यात नऊ महिन्यांत एसीबीचे ६९८ सापळे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 8:24 PM

९४७ आरोपी जाळ्यात: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची माहिती

ठळक मुद्दे ही कारवाई १ जानेवारी ते १७ ऑक्टोबर या नऊ महिन्यांत करण्यात आली आहे.मुंबई ३०, ठाणे ७४, नाशिक ९८, नागपूर ८१, अमरावती ९६, नांदेड ६९ असे एकूण ६९८ ट्रॅप यशस्वी झाले.

संदीप मानकर

अमरावती - राज्यात लाचलुचपत प्रतिबंध विभागाने आठही विभागांत कारवाई करून नऊ महिन्यांत ६९८ सापळे यशस्वी केले. अधिकारी, कर्मचारी व खासगी व्यक्ती असे एकूण ९४७ आरोपी  जाळ्यात अडकल्याची माहिती एसीबीने दिली आहे.  ही कारवाई १ जानेवारी ते १७ ऑक्टोबर या नऊ महिन्यांत करण्यात आली आहे.

राज्यात एसीबी सापळ्यांचा टक्का वाढला आहे.  मागील वर्षी संपूर्ण वर्षभरात ८९१ ट्रॅप झाले होते. यंदाही त्यापेक्षा जास्त ट्रॅप होतील, असा विश्वास अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. १ कोटी ५७ लक्ष ५८ हजार ९३५ रुपयांची सापळा रक्कम आहे. लाचखोरीत महसूल विभाग अव्वल स्थानी असून, १६४ सापळे यशस्वी झाले आहेत. दुसरा क्रमांक हा नेहमीप्रमाणे पोलीस प्रशासनाचा  आहे. १५७ सापळ्यांमध्ये २१७ आरोपी अडकले आहेत. महावितरणमध्ये ३३ सापळे टाकण्यात आले. महानगरपालिका ३७, नगर परिषद १५, जिल्हा परिषद २९, पंचायत समिती ६४, वनविभाग १६, जलसंपदा विभाग १५, आरोग्य विभाग २२, सहकार व पणन विभाग १४, शिक्षण विभाग २२, प्रादेशिक परिवहन विभागामध्ये १३ तसेच इतर विभागांचाही सापळ्यांमध्ये समावेश आहे.

सर्वाधिक एसीबी ट्रॅप हे पुणे विभागात १४४ झाले असून,  १०६ सापळ्यंसह औरंगाबाद विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई ३०, ठाणे ७४, नाशिक ९८, नागपूर ८१, अमरावती ९६, नांदेड ६९ असे एकूण ६९८ ट्रॅप यशस्वी झाले.वर्ग-१ चे ४७ अधिकारी अडकलेलाचखोरीत वर्ग-१ चे अधिकारीसुद्धा मागे नाहीत. राज्यात आतापर्यंत या संवर्गातील ४७ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहेत. वर्ग २ चे ८०, तर सर्वाधिक वर्ग ३ च्या ५६५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. इतर लोकसेवक ५९, तर खासगी व्यक्ती १५३ यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे.अपसंपदेची १७ प्रकरणे दाखलराज्यात ज्या अधिकाऱ्यांकडे अपसंपदा आढळून आली, त्यांच्याविरुद्ध १७ प्रकरणे एसीबीने दाखल करण्यात आले आहे. यामध्ये एकूण ३४ आरोपींचा समावेश असून, ९ कोटी ८८ लाख ८१ हजार ३१ रूपयांची  अपसंपदा प्रकरणातील मालमत्ता रक्कम आहे. अन्य भ्रष्टाचाराचीसुद्धा चार प्रकरणे दाखल झाली आहेत. यामध्ये एकूण १० आरोपींचा समावेश आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसAmravatiअमरावती