वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 21:24 IST2025-12-06T21:23:47+5:302025-12-06T21:24:34+5:30
मध्य प्रदेशच्या सागर शहरातील लाजपतपुरा वॉर्डमधील नगरसेवक नईम खान यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला.

फोटो - आजतक
मध्य प्रदेशच्या सागर शहरातील लाजपतपुरा वॉर्डमधील नगरसेवक नईम खान यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. ६७ वर्षीय नईम खान हे २५ वर्षीय महिलेशी लग्न केल्यामुळे आणि भाजपामधून काढून टाकल्यामुळे चर्चेत होते. यानंतर नईम खान यांना अचानक अस्वस्थ वाटलं, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. कुटुंबातील सदस्य नगरसेवकाच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत, त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं
या घटनेनंतर सून शिखा खानने प्रतिक्रिया दिली आहे. शिखा म्हणाली की, तिचे सासरे नईम यांनी सप्टेंबरमध्ये २५ वर्षीय महिलेशी दुसरं लग्न केलं होतं. तेव्हापासून ते त्रासात होते. लग्नानंतर दररोज त्यांच्यामध्ये वाद होत होते. त्यामुळेच तणाव वाढला होता. नईम खान हे त्यांच्या पहिल्या पत्नीचं कुटुंब सोडून शनिचरी येथील त्यांच्या कार्यालयासमोरील घरात दुसऱ्या पत्नीसोबत राहत होते.
सकाळी सुनेला त्यांची तब्येत बिघडल्याचा फोन आला. पोहोचल्यावर त्यांना कळलं की त्यांचा मृत्यू झाला आहे. यानंतर कुटुंबाने पोलीस चौकशीची मागणी केली आहे. तसेच पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल असं सांगितलं आहे. नईम खान हे गेल्या अडीच महिन्यांपासून वादात अडकले होते.
६७ व्या वर्षी २५ वर्षीय महिलेशी लग्न करण्यापूर्वी त्याच महिलेने त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. महिलांवरील त्यांच्या गुन्ह्यांमुळे आणि गंभीर आरोपांमुळे भाजपाने त्यांना पक्षातून काढून टाकलं. लग्नानंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नीनेही गोपाळगंज पोलीस ठाण्यात नईम खान यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. आता पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.