संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये...; आरोपी 3 मुलांचा बाप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 15:03 IST2025-12-10T15:03:00+5:302025-12-10T15:03:58+5:30
...अन् आई-वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली चिमुकली... पीडित चिमुकलीने आरोपीला ओळखलं...

संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये...; आरोपी 3 मुलांचा बाप!
गुजरातच्या राजकोटमधून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका सहा वर्षांच्या निरागस मुलीचे अपहरण करून एका ३० वर्षीय व्यक्तीने तिच्यावर क्रूर अत्याचार केला. एवढेच नाही, तर तीन मुलांचा बाप असलेल्या या नराधमाने तिच्या प्रायव्हेटपार्टमध्ये लोखंडी रॉडही टाकला. आरोपीचे नाव राम सिंह असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तर जखमी चिमुकल्या पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राजकोट जिल्ह्यातील अटकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार ४ डिसेंबर रोजी घडला. मुलीचे आई-वडील शेतकाम करण्यासाठी बाहेर गेले असता, नराधम राम सिंहने संधी साधत चिमुकलीचे अपहरण करत एका निर्जन स्थळी नेले आणि तेथेच तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नाही, तर त्याने साधारणपणे एक फूट लांबीचा लोखंडी रॉडही त्याच्या गुप्तांगात (प्रायव्हेट पार्ट) टाकला.
...अन् आई-वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली चिमुकली -
काम संपवून जेव्हा तिचे आई-वडील घरी परतले, तेव्हा त्यांना आपली मुलगी दिसली नाही. जेव्हा त्यांनी तिचा शोध घेतला, तेव्हा ती घटनास्थळावर रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. यानंतर त्यांनी तिला तातडीने जवळच्या एका रुग्णालयात दाखल केले. यानंतर, तिला पुढील उपचारांसाठी राजकोटला हलवण्यात आले.
तातडीने १० पोलीस पथके तयार -
रुग्णालयाकडून मिळालेल्या सूचनेनंतर, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तातडीने १० पथके तयार केली. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच, टेलिकॉम कंपन्यांकडून घटनास्थळ परिसरातील सक्रिय मोबाइल्सचा डेटा मिळवत तपास सुरू केला.
...अन् पीडित चिमुकलीने आरोपीला ओळखले -
राजकोट ग्रामीनचे एसपी विजय सिंह गुर्जर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी १४० संशयितांची यादी तयार करून त्यांची चौकशी केली. यानंतर, काउंसलर, महिला पोलीस अधिकारी आणि डॉक्टरांच्या उपस्थितीत १० संशयितांचे फोटो पीडितेला दाखवण्यात आले, तेव्हा तिने आरोपीला ओळखले.
आरोपी राम सिंह आणि पीडित कुटुंब MPचे -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. पीडित चिमुकली जखमी झाल्यानंतर आणि तिला रक्तस्त्राव होऊ लागल्यानंतर, तो फरार झाला होता. आरोपी राम सिंह मध्य प्रदेशातील अलीराजपूरचा रहिवासी असून गेल्या दोन वर्षांपासून राजकोटमध्ये काम करतो. तो 12 वर्षांची एक मुलगी आणि दो मुलांचा बाप आहे. पीडितेचे कुटुंबही मुळचे मध्य प्रदेशातीलच आहे. शेतीकामासाठी मजूर म्हणून ते राजकोट येथे आले आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात बीएनएसच्या कलम 65 (2) आणि पॉक्सो अॅक्टच्या कलम 5 (I), 5 (M), आणि 6 (1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे..