59 lakh confiscated along with stocks of banned gutkha | प्रतिबंधित गुटख्याच्या साठ्यासह ५९ लाखांचा मुद्देमाल जप्त 

प्रतिबंधित गुटख्याच्या साठ्यासह ५९ लाखांचा मुद्देमाल जप्त 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - काशिमीरा पोलिसांनी चेणे गावाच्या हद्दीतील एका गोदामात ठेवण्यासाठी आणला गेलेला ४९ लाखांचा गुटखा जप्त केला आहे . सदर गुटखा वाहतुकीसाठी वापरलेली दोन वाहने देखील पोलिसांनी गुन्ह्यात जप्त केली असून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले . 

 चेणे गावच्या हद्दीतील एका गोदामात दोन वाहना मधून गुटख्याचा साठा आणला जाणार असल्याची माहिती 

सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र भामरे यांना मिळाली . सहाय्यक पोलीस आयुक्त विलास सानप आणि वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शना खाली भामरे व पोलीस पथकाने मंगळवारी कारवाई केली . 

या प्रकरणी जाफर हुसेन अक्रमअली खान ( २३ ) रा. मुन्शी कंपाउंड , काशिमीरा आणि सुदाम आनंदराव जमरे ( २४) व नवनाथ सुभाषराव बारसे ( २४) दोघे हि रा. पुरंदा , वसमत,  हिंगोली या तिघांना त्यांच्या कडील आयशर कंटेनर व महेंद्रा पिकअप हि दोन वाहनांसह ताब्यात घेऊन ४९ लाख १७ हजार ६०० रुपयांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला आहे . जप्त गुटखा व वाहनं मिळून ५९ लाख १७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल असल्याचे पोलिसांनी सांगितले .  बंदी असलेल्या गुटख्याची शहरात खुलेआम विक्री आणि तस्करी होत असल्याचे प्रकार चाल असतानाच गुटख्याची गोदामे चर्चेचा विषय ठरली आहेत . 

Web Title: 59 lakh confiscated along with stocks of banned gutkha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.