चूक पडली इतकी महागात! ५ वर्षाचा चिमुकला ज्यूस समजून प्यायला आजोबांनी आणलेली दारू अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 19:23 IST2021-10-05T17:48:15+5:302021-10-05T19:23:57+5:30
5 years Old Boy Dies After Mistakenly Consuming Liquor : ६२ वर्षीय आजोबा जे दम्याचे रुग्ण आहेत, बेशुद्ध अवस्थेतील नातवाला पाहून त्यांची प्रकृती बिघडली.

चूक पडली इतकी महागात! ५ वर्षाचा चिमुकला ज्यूस समजून प्यायला आजोबांनी आणलेली दारू अन्...
चेन्नई - आपल्या आजोबांनी ठेवलेला दारू चुकून ज्यूस आहे असे समजून प्यायल्याने ५ वर्षांच्या मुलाचा वेल्लोरमध्ये मृत्यू झाला. ६२ वर्षांचे आजोबाही मुलाचे हाल पाहून आश्चर्यचकित झाले.
द न्यू इंडियन एक्स्प्रेसमध्ये दिलेल्या वृत्तानुसार, चिन्नासामी (६२) यांनी दारूच्या दुकानातून ब्रँडीची बाटली खरेदी केली होती. आजोबांनी दारू बऱ्यापैकी सेवन केल्यानंतर उरलेली ठेवली होती. त्यांनी बाटली त्यांच्याजवळ ठेवली आणि ती बॉटल नातू रुकेशच्या हाताला लागू नये अशी ठेवली नव्हती.
चिन्नासामीला दारूच्या नशेत झोप लागल्यावर नातवाच्या हाती ती बाटली सहज लागली आणि ज्यूस समजून तो ते प्यायला, असे तक्रारीत म्हटले आहे. रुकेशला तात्काळ श्वास कोंडू लागला आणि त्यावेळी त्याचे पालक मदतीसाठी धावले. चिन्नासामीही त्यावेळी जागे झाले आणि त्यांच्या नातवाची अवस्था पाहून त्यांना धक्का बसला. ६२ वर्षीय आजोबा जे दम्याचे रुग्ण आहेत, बेशुद्ध अवस्थेतील नातवाला पाहून त्यांची प्रकृती बिघडली.
कुटुंबाने दोघांनाही एका खासगी रुग्णालयात दाखल केले जेथे चिन्नासामी यांना मृत घोषित केले. रुग्णालयाने रुकेशला ख्रिश्चन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाठवण्यास आले. तेथे उपचाराला प्रतिसाद न देता त्या चिमुकल्याचा देखील मृत्यू झाला.
पोलिसांनी दोन्ही मृतदेह वेल्लोर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. तिरुवलम पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू अंतर्गत अपमृत्यूचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.