५ वर्षीय चिमुकलीचे लैंगिक शोषण करणारा ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 19:54 IST2019-03-13T19:51:01+5:302019-03-13T19:54:01+5:30
याप्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

५ वर्षीय चिमुकलीचे लैंगिक शोषण करणारा ताब्यात
मुंबई - निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ५ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक शोषण केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
शाळेतून आल्यानंतर पीडित चिमुकली नेहमी ट्युशनला जाते. त्यामुळे शाळेतून आल्यानंतर पीडित मुलगी घराबाहेर गेली होती. ट्युशनला पाठविण्यासाठी तिची आई तिला शोधत होती. शोधत शोधत घराबाहेर गेल्यानंतर आईला आपली मुलगी सापडली. तेव्हा तिने घडलेला दुर्दैवी प्रकार सांगितला. पोलिसांनी याबाबत प्रथम अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आणि विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले.