४० वयाचा प्रियकर, २४च्या प्रेयसीने पळून जाऊन केलं लग्न, १२ वर्षांपासून सुरू होतं अफेअर; पोलिसांकडे सुरक्षेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 11:44 IST2022-02-02T11:39:02+5:302022-02-02T11:44:11+5:30

हे जोडपं लग्नानंतर वरिष्ठ पोलीस अधिक्षकांच्या ऑफिसमध्ये पोहोचलं आणि त्यांनी सांगितलं की, तरूणीच्या घरातील लोक या लग्नाच्या विरोधात आहेत. आणि आता त्यांच्या जीवाला धोका आहे.

40 year old man marriage with 24 years old girlfriend, filled report over life threatening in Bareilly Uttar Pradesh | ४० वयाचा प्रियकर, २४च्या प्रेयसीने पळून जाऊन केलं लग्न, १२ वर्षांपासून सुरू होतं अफेअर; पोलिसांकडे सुरक्षेची मागणी

४० वयाचा प्रियकर, २४च्या प्रेयसीने पळून जाऊन केलं लग्न, १२ वर्षांपासून सुरू होतं अफेअर; पोलिसांकडे सुरक्षेची मागणी

प्रेम ही गोष्टच माणसांना एकमेकांशी जोडून ठेवते. यात ना वय महत्वाचं असतं ना कोणता बंधन. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बरेलीमधून (Bareilly) अशीच एक घटना समोर आली आहे. इथे ४० वर्षीय व्यक्ती २४ वर्षीय तरूणीच्या प्रेमात (Love Story) पडली आणि मग दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केलं. आता दोघांनीही पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. हे जोडपं लग्नानंतर वरिष्ठ पोलीस अधिक्षकांच्या ऑफिसमध्ये पोहोचलं आणि त्यांनी सांगितलं की, तरूणीच्या घरातील लोक या लग्नाच्या विरोधात आहेत. आणि आता त्यांच्या जीवाला धोका आहे.

बरेलीच्या फतेहगंज पश्चिममध्ये राहणारा ४० वर्षीय जयवली सिंह याचं शेजारी राहणाऱ्या २४ वर्षीय तरूणीसोबत गेल्या १२ वर्षापासून प्रेमप्रकरण सुरू होतं. दोघेही एकमेकांच्या शेजारी राहत होते आणि दोघेही नेहमीच भेटत होते. प्रेयसीने सांगितलं की, जेव्हा ती प्रेमात पडली त्यावेळी तिचं वय केवळ १२ वर्ष होतं.

२५ जानेवारीला पळून जाऊन केलं लग्न

बऱ्याच वर्षापासून सुरू असलेल्या या प्रेमप्रकरणानंतर दोघांनी लग्नाचा प्लान केला आणि २५ जानेवारीला दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केलं. दोघांनाही आयुष्यभर सोबत रहायचं आहे. पण लग्नानंतर प्रेयसीच्या घरातील लोक संतापले आहेत. दोघांनी पोलिसांकडे लिखित तक्रार दिली. ज्यात त्यांनी सांगितलं की, दोघांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षा देण्यात यावी.

याप्रकरणी पोलीस अधिकारी रोहित सिंह सजवाण म्हणाले की,  त्यांच्यासमोर हे प्रकरण आलं आहे आणि ते यावर आवश्यक ती कारवाई करतील. दोन्ही पक्षांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून चर्चा करण्याचाही विचार असल्याचं ते म्हणाले. हे प्रकरण लवकर मार्गी लावलं जाईल.
 

Web Title: 40 year old man marriage with 24 years old girlfriend, filled report over life threatening in Bareilly Uttar Pradesh