शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

४ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार; नराधमाला २१ वर्षाचा सश्रम कारावास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 8:15 PM

जिल्हासत्र न्यायालयाचा निकाल: पीडितेला ५० हजार रूपये मदत देण्याचे आदेश

ठळक मुद्देया दंडाच्या रकमेतील ५० हजार रूपये पिडीतेला द्यावे. दंड न भरल्यास ३ वर्षाचा अतिरिक्त कारावास जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावला आहे.देवरी येथील वॉर्ड क्रमांक ९ मध्ये राहणारा आरोपी अश्वीन उर्फ सोनू विठ्ठल मेश्राम (२९) याने ४ वर्ष सहा महिन्याच्या चिमुकलीवर अत्याचार केला.

गोंदिया - देवरीच्या वॉर्ड क्र. ९ येथील आरोपीने साडे चार वर्षाच्या मुलीवर १ जून २०१९ रोजी सकाळी ७.३० वाजता बलात्कार केला होता. या प्रकरणातील नराधमाला २१ वर्षाचा सश्रम कारावास व ७५ हजार रूपये दंड ठोठावला आहे. या दंडाच्या रकमेतील ५० हजार रूपये पीडितेला द्यावे. दंड न भरल्यास ३ वर्षाचा अतिरिक्त कारावास जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावला आहे.देवरी येथील वॉर्ड क्रमांक ९ मध्ये राहणारा आरोपी अश्वीन उर्फ सोनू विठ्ठल मेश्राम (२९) याने ४ वर्ष सहा महिन्याच्या चिमुकलीवर अत्याचार केला. चिमुकली अंगणात खेळत असतांना तिला चॉकलेटचे आमिष देऊन आपल्या घरी नेले. तिच्यावर बळजबरी केली. आरोपीने त्या पिडीतेला दोन-चार वेळा चाकलेट देण्याचे आमिष देऊन आपल्याकडे बोलावले होते. परंतु ती गेली नव्हती. परंतु आरोपीने संधी पाहून तिला आपल्या घरी नेले. तिच्यावर अत्याचार केला. यासंदर्भात मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी नराधमावर देवरी पोलीसांनी भादंविच्या कलम ३७६ (ए,बी), बाल लैंगीक अत्याचार अधिनियमाचे कलम ६, १० अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी केला होता. न्यायालयात १५ साक्षदार तपासण्यात आले. आज (दि.७) रोजी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश सुहास माने यांनी या प्रकरणावर सुनावणी केली. सरकारी वकील म्हणून जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. महेश चांदवानी यांनी काम पाहिले. या घटनेला घेऊन देवरी येथील नागरिक पुढे आले होते. तीन दिवस बंद पुकारून आरोपीला त्वरीत शिक्षा व्हावी यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते.२५२ दिवसात आला निकालबाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांकडे शासनानचे विशेष लक्ष आहे. देवरी येथे घडलेला गुन्हा ते न्यायालयाकडून दिलेला निर्णय हे एकंदरीत २५२ दिवसात हा निकाल देण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने त्वरीत दिलेल्या निकालामुळे आनंद व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारCourtन्यायालयPoliceपोलिसjailतुरुंगPOCSO Actपॉक्सो कायदा