शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

३० लाखांचा खर्च, १५ लाखांचा हुंडा; पाठवणीनंतर नवरीला समजलं IAS नवऱ्याचं 'ते' धक्कादायक सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 11:02 IST

कुटुंबाने आपल्या मुलीचं लग्न स्वतःला आयएएस (IAS) अधिकारी सांगणाऱ्या व्यक्तीशी मोठ्या थाटामाटात लावून दिलं. मात्र पाठवणीनंतर काही तासांतच जे सत्य समोर आलं, त्याने संपूर्ण कुटुंबाला हादरलं आहे.

गोरखपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका कुटुंबाने आपल्या मुलीचं लग्न स्वतःला आयएएस (IAS) अधिकारी सांगणाऱ्या व्यक्तीशी मोठ्या थाटामाटात लावून दिलं. मात्र पाठवणीनंतर काही तासांतच जे सत्य समोर आलं, त्याने संपूर्ण कुटुंबाला हादरलं आहे. कँट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहद्दीपूर भागात राहणारं एक कुटुंब आपल्या मुलीसाठी चांगल्या स्थळाच्या शोधात होतं.

एका मॅट्रिमोनिअल ग्रुपच्या माध्यमातून प्रीतम कुमार निषाद नावाच्या तरुणाचं स्थळ आलं. या तरुणाने तो आयएएस अधिकारी असल्याचं सांगितलं आणि आपली पोस्टिंग माणिकपूर येथे असल्याचं भासवलं. कुटुंबाचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने बनावट इंटरव्ह्यूचे व्हिडीओ, ऑफिसचे फोटो आणि काही नेत्यांसोबतचे आपले फोटोही शेअर केले. हे सर्व पाहून कुटुंबाची खात्री पटली की, आपल्या मुलीचं नातं एका प्रतिष्ठित अधिकाऱ्याशी जुळत आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला या तरुणाने आपण हुंडा न घेता लग्न करणार असल्याचं सांगून कुटुंबाचा अधिकच विश्वास जिंकला.

हुंड्यासाठी १५ लाखांची मागणी

लग्न ठरल्यानंतर तयारी जोरात सुरू झाली. मात्र साखरपुड्याच्या काही काळ आधी तरुणाने अचानक लग्नाच्या खर्चाच्या नावाखाली १५ लाख रुपयांची मागणी केली. नातं तुटण्याच्या भीतीने आणि सामाजिक प्रतिष्ठेपोटी कुटुंबाने ही मागणी मान्य केली. साखरपुड्याच्या दिवशी १० लाख रुपये रोख देण्यात आले, तर उर्वरित ५ लाख रुपये नंतरच्या कार्यक्रमात देण्यात आले. आपली पोस्टिंग बाहेर असते, त्यामुळे संसाराचं सामान नंतर द्या, असं सांगून त्याने कुटुंबाला गाफील ठेवलं.

३० लाखांचा खर्च आणि दिमाखदार सोहळा

११ मार्च २०२६ रोजी नंदा नगर येथील एका मॅरेज लॉनमध्ये हा विवाहसोहळा सर्व रितीरिवाजांनुसार पार पडला. मोहद्दीपूरमधील एका हॉटेलमध्ये पाहुण्यांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. मुलीच्या वडिलांच्या मते या लग्नात तब्बल ३० लाख रुपये खर्च झाले. १२ मार्च रोजी मुलीची पाठवणी झाली. मात्र काही तासांतच एका फोनने सर्व काही बदलून टाकलं. लग्नात सहभागी झालेल्या एका व्यक्तीने नवरीला सांगितलं की, तिचा पती कोणताही आयएएस अधिकारी नाही. हे ऐकताच नवरीच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिने तातडीने आपल्या वडिलांना फोन केला.

एका खोलीत राहणारा तोतया अधिकारी फरार

मुलीचा फोन येताच कुटुंबीय वेळ न घालवता इटावा येथे पोहोचले. तिथे आरोपीने दिलेल्या पत्त्यावर गेल्यावर त्यांना धक्काच बसला. ज्याला ते आयएएस अधिकारी समजत होते, तो एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहत होता. तिथे कोणतीही सरकारी सुविधा किंवा अधिकाऱ्यासारखं वातावरण नव्हतं. कुटुंबीयांना पाहताच आरोपी आपल्या बहिणीसह तिथून पसार झाला. या फसवणुकीमुळे मुलीच्या कुटुंबाला मोठा मानसिक आणि आर्थिक धक्का बसला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसmarriageलग्न