26 year old married two time, was preparing for the third ... Read what happened next | 26 वर्षांच्या तरुणाची दोन लग्नं झालेली, तिसऱ्याच्या तयारीत होता...वाचा पुढे काय झाले
26 वर्षांच्या तरुणाची दोन लग्नं झालेली, तिसऱ्याच्या तयारीत होता...वाचा पुढे काय झाले

ठळक मुद्दे तिघींना फसवणाऱ्या या भामट्याचं नाव अरविंद उर्फ दिनेश असं असून तो एका खाजगी कंपनीत नोकरी करतो.  दोन्ही बायकांनी दिनेशविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत तिसऱ्या लग्नाविरोधात तक्रार दाखल केली. 

चेन्नई - दोघींशी लग्न करून नंतर तिसऱ्या तरुणीच्या शोधात असलेल्या तरुणाला दोन पत्नींनी त्याच्या कार्यालयात जाऊन चोप दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना तामिळनाडू येथील कोयमतूर परिसरात घडली आहे. तिघींना फसवणाऱ्या या भामट्याचं नाव अरविंद उर्फ दिनेश असं असून तो एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. 

२६ वर्षीय या युवकाने २०१६ साली प्रियदर्शनी नावाच्या एका मुलीशी लग्न केले. लग्नानंतर दिनेशचे प्रियदर्शनीसोबत पटत नव्हते. याबाबत प्रियदर्शनीने दिनेशच्या आई - वडिलांना तक्रार केली. मात्र त्यांनी कानाडोळा केला. त्यामुळे नाईलाजाने प्रियदर्शनीने दिनेशविरोधात गुन्हा दाखल केला. नंतर प्रियदर्शनी आपल्या आई - वडिलांकडे जाऊन राहू लागली. दरम्यान दिनेशने मॅट्रिमोनिअल साईटवर दुसऱ्या पत्नीसाठी शोधकार्य सुरु केले. एप्रिल २०१९ साली पहिले झालेले लग्न लपवून त्याबाबत काहीही न सांगता दुसरे लग्न अनुप्रिया नावाच्या मुलीशी केले. अनुप्रिया घटस्फोटित होती असून तिला दोन वर्षाचा मुलगा देखील आहे. लग्नानंतर काही दिवसांनी अनुप्रियासोबत प्रियदर्शनीसारखे दिनेशचे खटके उडू लागले. अनुप्रिया देखील दिनेशच्या नेहमीच्या वादाला कंटाळून आई - वडिलांकडे निघून गेली. त्यानंतर लगेच दिनेशने आपल्या इंटरनेटच्या जाळ्यात तिसऱ्या मुलीला फसविण्यास सुरुवात केली. याबाबत प्रियदर्शनी आणि अनुप्रिया या दोघींना माहिती मिळताच त्यांनी दिनेशने कार्यालय गाठले आणि दिनेशला कार्यालयाबाहेर पाठविण्यास सांगितले. मात्र, कंपनीतून बाहेर येण्यास परवानगी नव्हती. दरम्यान दोघींनी कंपनीत बसल्या आणि विरोध प्रदर्शन करू लागल्या. त्यानंतर कंपनीने पोलिसांना बोलविले. दोन्ही पत्नी आणि त्याचे नातलग देखील जमा झाले. पोलिसांनी दिनेश आणि त्याच्या दोन्ही पत्नींना पोलीस ठाण्यात बोलाविले. त्यावेळी दिनेश कंपनीबाहेर आला तेव्हा दोन्ही बायकांनी त्याला चोप देण्यास सुरुवात केली. दरम्यान दोन्ही बायकांनी दिनेशविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत तिसऱ्या लग्नाविरोधात तक्रार दाखल केली. 

Web Title: 26 year old married two time, was preparing for the third ... Read what happened next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.