दुःखद! १६ वर्षीय विद्यार्थिनी राहिली गरोदर; आत्महत्येनंतर प्रिन्सिपल, वॉर्डनसह ३ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 20:01 IST2022-01-19T19:27:54+5:302022-01-19T20:01:34+5:30
Suicide Case : चेंगलपट्टू जिल्ह्यातील कोवलम येथे मुलगी सुट्टीच्या दिवशी तिच्या घरी पोहोचली तेव्हा ही बाब उघडकीस आली.

दुःखद! १६ वर्षीय विद्यार्थिनी राहिली गरोदर; आत्महत्येनंतर प्रिन्सिपल, वॉर्डनसह ३ जणांना अटक
तामिळनाडूतील तिरुवन्नामलाई जिल्ह्यात १६ वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि वसतिगृहाच्या वॉर्डनलाही आरोपी केले आहे. घटनेची माहिती मिळूनही दोघांनीही बाल संरक्षण विभागाला माहिती दिली नाही.
चेंगलपट्टू जिल्ह्यातील कोवलम येथे मुलगी सुट्टीच्या दिवशी तिच्या घरी पोहोचली तेव्हा ही बाब उघडकीस आली. येथे तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. तात्काळ कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या बाळाच्या पोटात ६ महिन्यांचा गर्भ असल्याचे डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले. कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांत गुन्हा दाखल केला. शाळेजवळ राहणारा हरिप्रसाद हा याला कारणीभूत असल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. पाच दिवसांच्या उपचारानंतर मंगळवारी मुलीचा मृत्यू झाला.
अजबच! 'तो' चोरत होता महिलांची ही गोष्ट, न्यायाधीशांनी ८ दिवस पाळत ठेवली अन् रंगेहाथ पकडले
मात्र, मृत्यूपूर्वी तिचा जबाब नोंदवण्यात आला. मुलीच्या साक्षीनंतर पोलिसांनी हरिप्रसादला पॉक्सो कायद्यांतर्गत अटक केली. पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापक आणि वॉर्डनलाही अटक केली आहे.