१३ वर्षीय मुलीचा शाळेत सापडला मृतदेह, बलात्कार झाल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 20:34 IST2020-08-24T20:32:31+5:302020-08-24T20:34:22+5:30
मेहरमा पोलीस ठाण्याच्या परिसरातील खिरोंधी गावातील शाळेच्या एका खोलीत हा मृतदेह आढळला. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

१३ वर्षीय मुलीचा शाळेत सापडला मृतदेह, बलात्कार झाल्याचा संशय
झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यातील एका शाळेत रविवारी एका १३ वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला, अशी माहिती पोलिसांनी दिली. ते म्हणाले की, मेहरमा पोलीस ठाण्याच्या परिसरातील खिरोंधी गावातील शाळेच्या एका खोलीत हा मृतदेह आढळला. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा संशय आम्हाला वाटत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतदेह पोस्टमार्टम तपासणीसाठी पाठविला, असे ते पुढे म्हणाले. स्थानिक आमदार दीपिका पांडे सिंह यांनी "दोषींना अटक करुन फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा" अशी मागणी केली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?
सीबीआय तपासाची चक्रं जोरात फिरली, टीम सुशांत राजपूतच्या घरी या व्यक्तींसोबत पोहोचली!
'तबलिघी जमात'ला बनवलं बळीचा बकरा, FIR रद्द करण्याचे दिले कोर्टाचे आदेश