धक्कादायक! जन्मजात अपंग असल्याने १३ दिवसांच्या अर्भकाला आई वडिलांनीच मारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 14:18 IST2020-10-14T14:15:36+5:302020-10-14T14:18:09+5:30
पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या पाठीमागे असणाऱ्या जंगलात या अर्भक पुरल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

धक्कादायक! जन्मजात अपंग असल्याने १३ दिवसांच्या अर्भकाला आई वडिलांनीच मारले
पुणे (धायरी): सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ दिवसाच्या एका अर्भकाला वडिलांनी ठार मारून पुरल्याचा प्रकार घडला आहे. घटनास्थळी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी पोहचले असून पुढील तपास करीत आहेत.
सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगांव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजच्या पाठीमागे असणाऱ्या जंगलात एक अर्भक पुरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जन्मलेले बाळ हे अपंग असल्याने आई वडिलांनी त्या अर्भकाला जंगलात पुरले आहे. आरोपींनी मंदिरात जाऊन लग्न केले होते. तसेच ते वडगांव बुद्रुक येथील जाधवनगर परिसरात राहत असून मजुरी करून ते उदरनिर्वाह करीत आहेत. परिसरातील नागरिकांना त्यांना झालेले मुल गायब असल्याचे समजल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना
माहिती कळविल्याने सदर प्रकार समोर आला. आरोपी आई वडिलांना सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त पी डी राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके आदी अधिकारी व कर्मचारी पोहचले असून अधिक तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत