नालासोपारा - पश्चिमेकडील राहत्या इमारतीच्या गार्डनमधील असलेल्या इलेक्ट्रिक खांबाला हात लावल्यावर शॉक लागल्याने 12 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना गुरुवारी संध्याकाळी घडली आहे. नालासोपारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. नालासोपारा पश्चिमेकडील राहुल हायस्कूलच्या पाठीमागे असलेल्या सरस्वती अपार्टमेंटमध्ये सदनिका नंबर 03 मध्ये राहणारा प्रतिम दिनकर माळी (12) हा गुरुवारी संध्याकाळी खेळण्यासाठी घरणाबाहेर पडला. इमारतीच्या खाली असलेल्या गार्डनमध्ये खेळत असताना इलेक्ट्रिक खांबाला हात लागला, त्या खांबाला अचानक शॉक लागल्याने प्रितम बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. त्याला उपचारासाठी रिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये आणल्यावर डॉक्टरांनी त्याला तपासल्यावर मृत घोषित केले.
शॉक लागून 12 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 21:32 IST
नालासोपारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
शॉक लागून 12 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू
ठळक मुद्दे प्रतिम दिनकर माळी (12) हा गुरुवारी संध्याकाळी खेळण्यासाठी घरणाबाहेर पडला.इमारतीच्या खाली असलेल्या गार्डनमध्ये खेळत असताना इलेक्ट्रिक खांबाला हात लागला, त्या खांबाला अचानक शॉक लागल्याने प्रितम बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला.