शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

१०० कोटींचा घोटाळा; आयएएस अधिकारी गौतम यांच्या एसीबी चौकशीची शिफारस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 14:21 IST

सुमारे १०० कोटी रुपयांचे कथित घोटाळ्यांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत (एसीबी) कारण्याची शिफारस कौशल्य विकास विभागाचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

ठळक मुद्देगौतम हे सध्या अतिरिक्त मुख्य सचिव असून, मानवाधिकार आयोगात कार्यरत आहेत. दोन वर्षांपासून हे प्रकरण थंड्या बस्त्यात आहे. आयएएस लॉबी गौतम यांना वाचवत आहे.

यदु जोशी 

मुंबई - सध्या मानवाधिकार आयोगाचे सचिव असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी विजयकुमार गौतम हे येथील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे २०११ ते २०१४ दरम्यान प्रभारी संचालक असताना झालेल्या सुमारे १०० कोटी रुपयांचे कथित घोटाळ्यांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत (एसीबी) कारण्याची शिफारस कौशल्य विकास विभागाचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

तत्कालीन व्यवसाय शिक्षण संचालक जे. डी. भुतांगे यांनी गौतम हे या घोटाळ्यात कसेकसे सामील होते, याचा मोठा अहवाल उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना दिलेला होता. गौतम हे सध्या अतिरिक्त मुख्य सचिव असून, मानवाधिकार आयोगात कार्यरत आहेत. भुतांगे यांचा अहवाल प्रमाण मानून खरे तर गौतम यांच्यावर शासनाने कारवाई करायला हवी होती, पण त्याऐवजी उद्योग व ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव / अतिरिक्त मुख्य सचिवांकडे चौकशी सोपविण्यात आली. एकमेकांचा बचाव करण्यासाठी सनदी अधिकारी तसेच प्रसिद्ध असतात. त्याचाच एक भाग म्हणून चौकशीला मुदतवाढ मिळत गेली. या प्रकाराने अस्वस्थ झालेले मंत्री निलंगेकर यांनी अधिकाऱ्यांचे हे संगनमत लक्षात घेऊन आता या प्रकरणी एसीबीची चौकशी करावी, असे पत्र मुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्य सचिव अजोय मेहता यांना दिले आहे. स्वत: निलंगेकर यांनी ही माहिती दिली. हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे ते म्हणाले.

या प्रकरणी तत्कालिन संचालक भुतांगे यांनी त्यांच्या अहवालात घोटाळ्यावर झगझगीत प्रकाश टाकला आहे. राज्यातील आयटीआयसाठी लागणाºया सामुग्रीच्या खरेदीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आला. सुमारे अडीचशे कोटी रुपयांच्या खरेदीमध्ये दामदुप्पट वा त्यापेक्षा जास्त दराने खरेदी करण्याचे प्रकार घडले. त्यात मोठ्या मशीन्स, लेथ मशीन्स आदींची खरेदी होती. खरेदीसंबंधीचे शासनाचे धोरण धाब्यावर बसविण्यात आले. निविदा प्रसिद्ध केल्यानंतर अटी व शर्ती बदलण्यात आल्या. अपात्र निविदा पात्र ठरविण्यात आल्या. भांडार खरेदी समितीची दिशाभूल करण्यात आली. प्रशासकीय/ वित्त विभागाची परवानगी नसताना नियमबाह्य पद्धतीने खरेदी कोषागारात सादर करून रकमा काढून फसवणूक करण्यात आली. काही प्रकरणांमध्ये अपात्र निविदाकारांना पात्र ठरवून सरकारचे ३६ कोटी रुपये गिळंकृत करण्यात आले, असे अहवालात म्हटले आहे.विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आणि एकनाथ खडसे यांनी या घोटाळ्याप्रकरणी लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली होती. त्यावर चौकशीची घोषणा करण्यात आली. त्यानुसार संचालकांनी अहवालही दिला पण पुढे सचिव पातळीवरील चौकशीचा फार्स करण्यात आला. दोन वर्षांपासून हे प्रकरण थंड्या बस्त्यात आहे. आयएएस लॉबी गौतम यांना वाचवत आहे.

संचालकांचा अहवाल काय म्हणतो?

अपात्र निविदाकारांना पात्र करून ५ कोटी ७१ लाख ३८ हजार ५९६ रुपये इतक्या निधीचा अपहार करण्यात आला.पाठयक्रमात अंतर्भूत सीएनसी मशीनची खरेदी करण्यात आली व ६ कोटी ३ लाख रुपयांचा अपहार करण्यात आला.मानकापेक्षा अधिक क्षमतेची यंत्रसामुग्री घेण्यात आली. त्यामुळे शासनाचे ३ कोटी ७ लाख रुपयांचे नुकसान झाले.केंद्रीय भांडाराकडून करण्यात आलेली नियमबाह्य खरेदी - ३ कोटी ४२ लाख रुवॉरंटी व प्रशिक्षण आणि बाजारभावाबाबत दिशाभूल करून १२.५२ कोटी रु.अतिरिक्त किंमत पुरवठादारांना देऊन शासनाची फसवणूक करण्यात आली.भांडार खरेदी समितीचे अध्यक्ष, सदस्य सचिव, तत्कालिन संचालक (प्रशिक्षण) यांनी संगनमताने घोटाळे केले.

 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस