शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, पगाराची व्यवस्था करा ना...! मनपा कर्मचार्‍यांचे नगर विकास राज्यमंत्र्यांना निवेदन

By admin | Updated: December 14, 2014 00:45 IST

अकोला: थकीत वेतनाच्या मुद्यावर संप पुकारलेल्या मनपातील कार्यरत तसेच कंत्राटी कर्मचार्‍यांनी शनिवारी सकाळी नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या निवासस्थानी धाव घेतली. वेतनाअभावी कुटुंबाची उपासमार होत असून, प्रशासन अजिबात गंभीर नसल्याचे सांगत कर्मचार्‍यांनी साहेब, तेवढी पगाराची व्यवस्था करा ना, अशी आर्त हाक डॉ.रणजित पाटील यांना दिली. यावर तोडगा काढणार असल्याचे आश्वासन राज्यमंत्री पाटील यांनी दिले.

अकोला: थकीत वेतनाच्या मुद्यावर संप पुकारलेल्या मनपातील कार्यरत तसेच कंत्राटी कर्मचार्‍यांनी शनिवारी सकाळी नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या निवासस्थानी धाव घेतली. वेतनाअभावी कुटुंबाची उपासमार होत असून, प्रशासन अजिबात गंभीर नसल्याचे सांगत कर्मचार्‍यांनी साहेब, तेवढी पगाराची व्यवस्था करा ना, अशी आर्त हाक डॉ.रणजित पाटील यांना दिली. यावर तोडगा काढणार असल्याचे आश्वासन राज्यमंत्री पाटील यांनी दिले.
मनपातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे सहा महिन्यांचे वेतन थकीत आहे. यात भरीस भर पाचव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कमही प्रशासनाने अद्यापपर्यंत अदा न केल्याने सर्वाधिक त्रास सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सहन करावा लागत आहे. वेतनाच्या मुद्यावर प्रशासन कर्मचार्‍यांची दिशाभूल करीत असल्याने तोडगा निघत नसल्याचे मत मनपा कर्मचारी संघर्ष समितीने व्यक्त केले. परिणामी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, असा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाच्या धोरणामुळे आम्ही कमालीचे वैतागल्याचे कर्मचार्‍यांनी स्पष्ट केले. यामधून तुम्हीच साहेब काही तरी मार्ग काढा, अशी विनवणी कर्मचारी संघर्ष समितीच्यावतीने नगर विकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांना करण्यात आली. थकीत वेतनाच्या मुद्यावर शासनाकडे सतत अनुदानाची मागणी केली जाते. प्रशासनाने आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत राज्यमंत्री डॉ.पाटील यांनी व्यक्त केले. तरी सुद्धा यावर तोडगा काढण्याचे आश्वासन डॉ.पाटील यांनी मनपा कर्मचार्‍यांना दिले.

बॉक्स...
मुदतवाढ देण्यास टाळाटाळ
मानधन तत्त्वावर कार्यरत १६९ मनपा कर्मचार्‍यांना मुदतवाढ देण्यास प्रशासन मागील चार महिन्यांपासून टाळाटाळ करीत असल्याचे कंत्राटी कर्मचार्‍यांनी नगर विकास राज्यमंत्र्यांना सांगितले. याविषयी संबंधित अधिकार्‍यांना निर्देश देणार असल्याचे डॉ.पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोट...
दहा महिन्यांमध्ये प्रशासनाने वसूल केलेला पैसा कोठे आहे, याचा ताळमेळ नाही. वेतनाच्या मुद्यावर प्रशासन जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करीत आहे. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची परिस्थिती फार बिकट आहे. यासर्व बाबी राज्यमंत्र्यांसमोर स्पष्ट केल्या.
-पी.बी. भातकुले, अध्यक्ष मनपा कर्मचारी संघर्ष समिती