शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकार परिषद

By admin | Updated: June 6, 2014 23:44 IST

शासनाच्या विचाराधीन निर्णयाचा आयएमएतर्फे काळ्या फिती लावून निषेध

शासनाच्या विचाराधीन निर्णयाचा आयएमएतर्फे काळ्या फिती लावून निषेध
औरंगाबाद : १ वर्षाचा औषधशास्त्र विभागाच्या अभ्यासानंतर ॲलोपॅथी पॅ्रक्टिस करण्याविषयी महाराष्ट्र शासन विचाराधीन असून, यामुळे जनतेच्या आरोग्याशी खेळण्यासारखे होईल. यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने काळ्या फिती लावून निषेध नोंदविला आहे, अशी माहिती अध्यक्ष सुरेंद्र लाठी, सचिव डॉ. कुलदीप राऊळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ॲलोपॅथीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यास जे शिक्षक शिकवितात त्यांची त्या विषयांमध्ये अतिनिष्णात व योग्य पदवीधर असल्यावरच नियुक्ती होते. जसे एम.डी., एम.एस. व औषधोपचार करीत असताना औषधोपचाराचे परिणाम व दुष्परिणाम याचा शिक्षकांच्या देखरेखीखाली अभ्यास करावा लागतो. महाराष्ट्र शासनाच्या येऊ घातलेल्या १ वर्षाच्या कोर्समध्ये वरील बाबींची पूर्तता होत नाही. तसेच भारतातील इतर कुठल्याही राज्यात अशा प्रकारची शैक्षणिक व्यवस्था नाही. सेंट्रल होमिओपॅथिक कौन्सिलचासुद्धा या निर्णयाला विरोध आहे, असे दिसून येते. बिगर ॲलोपॅथिक औषध उपचार पद्धती ही ॲलोपॅथीपेक्षा भिन्न आहे, जसे की, त्यांची रोगनिदान करण्याची पद्धत तसेच रोग, आजार कळण्याची मूळ प्रक्रिया या इतर बाबी भिन्न असल्यामुळे १ वर्षाच्या कोर्समध्ये ॲलोपॅथीचे संपूर्ण शिक्षण होत नाही व त्यामुळे अशा स्वरूपाच्या डॉक्टरांनी ॲलोपॅथीचे उपचार केल्यास रुग्णांच्या जीवितास धोका उत्पन्न होऊ शकतो किंवा रुग्णाला कायमचे अपंगत्व येऊ शकते. सरकारच्या निर्णयास आजपासून काळ्या फिती लावून तसेच हॉस्पिटलमध्ये बॅनर लावून जनजागृती करणारी पत्रके वाटप करणार आहोत. लवकरच एक केंद्रीय शिष्टमंडळ मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना भेटणार आहे, असेही डॉ. सुरेंद्र लाठी, सचिव डॉ. कुलदीप राऊळ यांनी सांगितले.
यावेळी डॉ. प्रवीण सोनी, डॉ. शिल्पा तोतला आदींसह आयएमएच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.