शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अरुण गवळीच्या जागी गीता गवळी मैदानात

By admin | Updated: September 12, 2014 01:06 IST

दगडी चाळीच्या पाठिंब्यावर एकदा आमदारकी गाजविणा-या अरुण गवळीस यंदा मात्र निवडणुकीच्या आखाड्यात उतरता येणार नाही

मुंबई : दगडी चाळीच्या पाठिंब्यावर एकदा आमदारकी गाजविणा-या अरुण गवळीस यंदा मात्र निवडणुकीच्या आखाड्यात उतरता येणार नाही. त्याच्या ऐवजी नगरसेवक असणारी त्याची मुलगी गीता गवळी भायखळा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे. अरुण गवळी सध्या तळोजा येथील तुरुंगात आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सर्वोच्च न्यायालयाने दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेल्यांची आमदारकी, खासदारकी रद्द करण्याचा निकाल गेल्या वर्षी दिला होता. त्यामुळे अरुण गवळीऐवजी गीता गवळी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अरुण गवळीने अखिल भारतीय सेना नावाचा स्वत:चा पक्ष काढला. मुलगी गीता गवळी आणि वहिनी वंदना गवळींच्या रूपाने या पक्षाचे दोन नगरसेवक मुंबई महापालिकेत आहेत. गीता गवळी यांच्याकडे सध्या सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्षपद असून सहा महिन्यांपासून त्यांनी विधानसभेच्या दृष्टीने कामाला सुरुवात केली आहे.दगडी चाळीवरील प्रभाव, वॉर्ड क्रमांक २०४ व २०५ मधील नगरसेवक या जोरावर भायखळ्यातून गीता गवळींनी दावेदारी ठोकली आहे. याच मतदारसंघातून गेल्या वेळी अरुण गवळीला तिसऱ्या क्रमांकाची २५ हजार मते मिळाली होती. तर, काँग्रेसचे विजयी उमेदवार मधू चव्हाणांना ३६ हजार मते मिळाली होती. (प्रतिनिधी)