Steel Plant blast: छत्तीसगडच्या स्टील प्लांटमध्ये भीषण स्फोट, ७ कामगारांचा मृत्यू; अनेक मजूर ढिगाऱ्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 14:11 IST2026-01-22T14:09:53+5:302026-01-22T14:11:43+5:30

बकुलाही येथील ‘रिअल इस्पात’ स्पंज आयरन फॅक्टरीत गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात ७ कामगारांचा मृत्यू झाला आहे.

Steel Plant blast: Massive explosion in Chhattisgarh steel plant, 7 workers killed; Many workers trapped under rubble | Steel Plant blast: छत्तीसगडच्या स्टील प्लांटमध्ये भीषण स्फोट, ७ कामगारांचा मृत्यू; अनेक मजूर ढिगाऱ्याखाली

Steel Plant blast: छत्तीसगडच्या स्टील प्लांटमध्ये भीषण स्फोट, ७ कामगारांचा मृत्यू; अनेक मजूर ढिगाऱ्याखाली

छत्तीसगडमधील बलौदाबाजार-भाटापारा जिल्ह्यातून एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बकुलाही येथील ‘रिअल इस्पात’ स्पंज आयरन फॅक्टरीत गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात ७ कामगारांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अनेक कामगार गंभीररित्या भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. स्फोट इतका भयानक होता की, अवघ्या काही सेकंदात फॅक्टरीचा एक भाग मलब्यात रूपांतरित झाला.

सकाळच्या सुमारास काळाचा घाला

२२ जानेवारीच्या सकाळी नेहमीप्रमाणे फॅक्टरीत काम सुरू होते. मजूर आपापल्या कामात व्यस्त असतानाच अचानक स्पंज आयरन युनिटमध्ये प्रचंड मोठा स्फोट झाला. या आवाजाने परिसरातील काही किलोमीटरचा परिसर हादरून गेला. स्फोटानंतर प्लांटमध्ये एकच धावपळ उडाली आणि आगीच्या ज्वाळांनी रौद्र रूप धारण केले. आपल्या डोळ्यादेखत सोबती मृत्यूच्या दरीत ओढले जात असल्याचे पाहून मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

बचावकार्य युद्धपातळीवर, ७ मृतदेह बाहेर

घटनेची माहिती मिळताच भाटापारा ग्रामीण पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जिल्हाधिकारी दीपक सोनी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने बचावकार्याची सूत्रे हाती घेतली. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत ७ मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. गंभीर जखमी झालेल्या मजुरांना प्राथमिक उपचारानंतर तातडीने बिलासपूरला हलवण्यात आले आहे. अद्यापही काही मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

सुरक्षा नियम पाळले नाहीत?

या भीषण स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार तांत्रिक बिघाड किंवा गॅस गळतीमुळे हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाने संपूर्ण प्लांट परिसर सील केला असून या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. औद्योगिक सुरक्षा विभागाची टीम आता फॅक्टरीमधील सुरक्षा मानकांची तपासणी करणार आहे.

अचानक झालेल्या या अपघातामुळे मजुरांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Web Title : छत्तीसगढ़ स्टील प्लांट में विस्फोट: सात मजदूरों की मौत, कई फंसे

Web Summary : छत्तीसगढ़ के एक स्टील प्लांट में विस्फोट से सात मजदूरों की मौत हो गई और कई घायल हो गए। फैक्ट्री आंशिक रूप से ढह गई, जिससे अन्य लोग फंस गए। दबे हुए लोगों को खोजने के लिए बचाव अभियान जारी है। सुरक्षा मानकों के उल्लंघन की जांच चल रही है।

Web Title : Chhattisgarh Steel Plant Blast: Seven Workers Dead, Many Trapped

Web Summary : A blast at a Chhattisgarh steel plant killed seven workers and injured several. The factory partially collapsed, trapping others. Rescue operations are underway to find those still buried. An investigation into safety standard violations is ongoing.