शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

हो़ आम्हालाही ओळख मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2016 00:12 IST

नांदेड : हो आम्हालाही आता ओळख मिळाली़़़आम्हीही ताठ मानेने जगण्यासाठी कष्ट करु, समाजासाठीही काम करण्याचा प्रयत्न करु़़़अशा आशादायी शब्दांसह अनेक गरजू महिलांनी रविवारी जिल्हा प्रशासनाला धन्यवाद दिले़

नांदेड : हो आम्हालाही आता ओळख मिळाली़़़आम्हीही ताठ मानेने जगण्यासाठी कष्ट करु, समाजासाठीही काम करण्याचा प्रयत्न करु़़़अशा आशादायी शब्दांसह अनेक गरजू महिलांनी रविवारी जिल्हा प्रशासनाला धन्यवाद दिले़ जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने गरजू महिलांना शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या़ त्याप्रसंगी या महिला भावनिक झाल्या होत्या़आ़ हेमंत पाटील, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांची उपस्थिती होती़ शिधापत्रिका मिळाल्याच्या समाधानामुळे कार्यक्रमासाठी उपस्थित अनेक महिला, त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता़ जिल्हा पुरवठा विभाग, तहसील आणि एड्स नियंत्रण सोसायटीच्या सेतू सेवाभावी संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले होते़ आ़ पाटील म्हणाले, समाजातील मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या, वंचित जीवन जगणाऱ्या गरजू महिलांना यापुढेही आवश्यक त्या गोष्टींसाठी सर्वतोपरी मदत दिली जाईल़ त्यांच्या समस्याबाबत दखल घेण्यात यावी़ त्यांना रोजगार, स्वयंरोजगार आणि सन्मानाचे जीवन जगण्यासाठी आवश्यक बाबींची वेळेवर पूर्तता व्हावी, असा प्रयत्न केला जाईल़ या घटकांची पुढची पिढी शिक्षण-प्रशिक्षण याद्वारे सक्षम व्हावी़ त्यांनी स्वताहाचे मार्ग शोधावेत यासाठीचे उपक्रम आखले जातील़ त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्याची ग्वाही पाटील यांनी दिली़ जिल्हाधिकारी काकाणी म्हणाले, शिधापत्रिका वाटपाचा उद्देशच या महिलांना ओळख मिळावी हा आहे़ यापुढे गरजू महिलांनी बचत गट स्थापन केल्यास त्या गटाला रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना देण्याचा प्रयत्न राहिल़ ज्यामुळे त्यांना शिधापत्रिका मिळणे आणि वेळेवर अन्नधान्याचा पुरवठा करणे या गोष्टी साध्य करता येतील़ (प्रतिनिधी)