शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
3
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
4
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
5
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
6
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
7
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
8
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
10
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
11
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
12
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
13
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
14
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
15
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
16
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
17
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
18
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
19
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
20
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

येलदरीत ट्रेलरने तोडले पुलाचे कठडे

By admin | Updated: May 19, 2014 00:16 IST

येलदरी : परभणी-फाळेगाव या राज्य महामार्गावरील येलदरी धरणाजवळ असलेल्या अरुंद पुलावर एका ट्रेलरने पुलाचे संपूर्ण कठडे तोडले़ यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही़

येलदरी : परभणी-फाळेगाव या राज्य महामार्गावरील येलदरी धरणाजवळ असलेल्या अरुंद पुलावर एका ट्रेलरने पुलाचे संपूर्ण कठडे तोडले़ यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही़ ही घटना १७ मे रोजी रात्री घडली़ जिंतूर तालुक्यातील येलदरी नदीवरील पूल अरुंद असल्यामुळे गतवर्षी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने एकाला जीव गमवावा लागला़ तसेच काही महिन्यांपूर्वी या पुलावरून जाणार्‍या एका शेत कामगाराने समोरून मोठे वाहन आल्यानंतर घाबरून नदीमध्ये उडी मारली होती़ या अरुंद पुलावर दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत़ अशा घटना घडूनही संबंधित विभाग नवीन पुलाची बांधणी करीत नाहीत़ त्यामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत़ एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच संबंधित वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींना जाग येते की काय असा सवाल परिसरातील नागरिकांमधून केला जात आहे़ १७ मे रोजी या अरुंद पुलावरून ट्रेलर जात असताना वाहन चालकाला अंदाज न आल्याने या पुलावरील सर्वच कठडे उखडून टाकले़ चालकाने ट्रेलर जागेवर सोडून इंजीन घेऊन पळ काढला़ पाठीमागील सांगडा पुलावर मधोमध ठेवल्याने दिवसभर या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़ या घटनेमुळे या पुलाचे मोठे नुकसान झाले आहे़ आता कठडे नसल्यामुळे या पुलावरून वाहतूक करणे धोक्याचे झाले आहे़ याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन नवीन पूल तयार करावा, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांमधून केली जात आहे़ (वार्ताहर) क्रेनच्या सहाय्याने सांगाडा बाजुला केला ट्रेलरचा पाठीमागील मोठा सांगडा पुलावर उभा होता़ हा सांगडा काढण्यासाठी सुरुवातीला ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला़ मात्र सांगडा हालत नसल्याने क्रेन मागवून घेतले़ क्रेनने सांगडा उचलत नसल्याने शेवटी हा सांगडा पुलाखाली ढकलण्यात आला़ त्यानंतरच या महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली़ या घटनेमुळे वाहतूक पूर्णत: खोळंबली होती़ वºहाडी बसले अडकून सध्या लग्न सराईचे दिवस आहेत़ १७ मे रोजी लग्नतिथी असल्याने सेनगाव व परभणीकडून लग्नासाठी जाणारे वºहाडी या पुलावर अडकून पडले़ त्यामुळे वºहाडी मंडळींची गैरसोय झाली़ परभणी, हिंगोली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग असून नसल्यात जमा आहे़ रस्ता व पुलाकडे या विभागाचे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे़ रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपांनी वेढले आहे़ याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़