शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिकेचे यंदाचे बजेट उत्पन्नाच्या मर्यादेतच

By admin | Updated: May 29, 2015 01:03 IST

औरंगाबाद : महानगरपालिकेच्या दरवर्षी फुगत जाणाऱ्या बजेटवर राज्य सरकारने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे यंदा पालिकेचे बजेट उत्पन्नाच्या मर्यादेतच ठेवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

औरंगाबाद : महानगरपालिकेच्या दरवर्षी फुगत जाणाऱ्या बजेटवर राज्य सरकारने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे यंदा पालिकेचे बजेट उत्पन्नाच्या मर्यादेतच ठेवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. परिणामी चालू आर्थिक वर्षाचे बजेट सहाशे कोटींच्या आतच राहणार असल्याचे लेखा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. महानगरपालिकेकडून प्रत्येक आर्थिक वर्षासाठी उत्पन्न आणि खर्चावर आधारित अंदाजपत्रक तयार केले जाते. परंतु गेल्या पाच- सात वर्षांपासून पालिकेतील सत्ताधारी जमा किंवा उत्पन्नाचा फारसा विचार न करता अवास्तव खर्चाचे बजेट तयार करीत आहेत. त्यामुळे बजेटचा आकार सातत्याने फुगत आहे. गेल्या आर्थिक वर्षात पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाच्या बजेटमध्ये वाढ करून ते ७९२ कोटी रुपयांचे केले. परंतु प्रत्यक्षात ४९२ कोटी रुपयांचेच उत्पन्न मिळाले. मागील काही वर्षात अशाच पद्धतीने उत्पन्नापेक्षा जास्त खर्चाचे बजेट बनविले गेले आहे. त्यामुळे राज्य सरकारने नुकतेच पालिका आयुक्तांना पत्र पाठवून त्याविषयी विचारणा केली आहे. सरकारनेच बोट ठेवल्यामुळे आता पालिकेच्या लेखा विभागाने चालू वर्षासाठी आटोपशीर बजेट तयार करण्याची तयारी चालविली आहे. चालू वर्षासाठीचे बजेट बनविण्याचे काम सुरू झाले असून येत्या एक-दोन महिन्यांत ते सर्वसाधारण सभेसमोर ठेवले जाणार आहे. मनपा निवडणुकीमुळे प्रशासनाने याआधी एप्रिल ते जून या काळासाठी दोनशे कोटी रुपयांचे लेखानुदान मंजूर करून घेतले होते. आता उर्वरित काळासाठी बजेट सर्वसाधारण सभेसमोर ठेवले जाणार आहे. लेखानुदानासह हे बजेट एकूण सहाशे कोटींच्या आत राहील असे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.