शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही छावण्यांवरच मदार

By admin | Updated: April 24, 2015 00:39 IST

बीड : २०१२-१३ च्या दुष्काळापेक्षा यंदाच्या दुष्काळाची दाहकता जास्त आहे. असे असतानाही जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही चारा छावणी सुरू करण्यास प्रशासनाला स्वायरस्य वाटत नाही.

बीड : २०१२-१३ च्या दुष्काळापेक्षा यंदाच्या दुष्काळाची दाहकता जास्त आहे. असे असतानाही जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही चारा छावणी सुरू करण्यास प्रशासनाला स्वायरस्य वाटत नाही. शेतकऱ्यांकडून मागणी होत असतानाही याकडे दुर्लंक्ष केले जात आहे.तीव्र चाऱ्याची टंचाई जाणवु लागल्यामुळे शेतकरी जनावरांना बाजाराचा मार्ग दाखवत आहे. बाजारपेठेतही जनावरांची आवक वाढल्यामुळे कवडीमोल दरांनी त्याची विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे एकीकडे उत्पादन घटल्यामुळे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे तळ हातावरच्या फोडाप्रमाणे जोपासलेल्या सर्जा-राजाच्या जोडीला मुकावे लागत आहे. यापुर्वी २०१२ साली दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यात सुमारे ८४ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील पशुधन वाचविण्यासाठी मदत झाली होती. यंदा तर ऐन एप्रिल महिन्यापासूनच चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पर जिल्ह्यातूनही कडबा, कडवळ आदी चाऱ्यांची आवक केली जात आहे.अद्यापपर्यंत जिल्ह्यात एकही चारा छावणी सुरू करण्यात आली नसली तर गावपातळीवरून चारा छावण्याची मागणी होत आहे. प्रशासनाकडून दुध संकलन वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. मात्र पशुमालकांना चारा टंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावण्यास सुरूवात झाली असल्याचे चित्र बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये पहावयास मिळत आहे. जोपर्यंत प्रशासन दुग्धव्यवसाय वाढीच्या मुळाशी म्हणजेच चारा उपलब्धतेबाबत ठोस पाऊले उचलणार नाही तोपर्यंत जिल्ह्यातील दुग्धव्यवसाय वाढणार नाही हे वास्तव चित्र निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)