शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा शिक्षकांना बदल्यांची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2016 23:44 IST

हिंगोली : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी २0१४ च्या शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करण्याचे पत्र प्राप्त झाले आहे

हिंगोली : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी २0१४ च्या शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करण्याचे पत्र प्राप्त झाले आहे. मात्र यंदाही शिक्षकांच्या बदल्या होणार की नाही, याबाबतच्या संदिग्धतेतच शिक्षण विभाग दिसत आहे.गतवर्षी संचमान्यता व शासन निर्णयाचा अन्वयार्थ काढल्याने शिक्षकांच्या बदल्यांची अडचण होऊन बसली होती. जि.प.च्या इतर विभागांच्या बदल्या झाल्या तरीही शिक्षण विभागाच्या मात्र बदल्या झाल्या नव्हत्या. यंदाही शिक्षण विभागाने पूर्ण शासन निर्णय न पाहताच बदल्यांसाठी सामान्य प्रशासनकडून मार्गदर्शन मागविण्याची तयारी चालविली होती. शासनाने बदल्यांबाबत पत्र पाठविल्याचे कळताच शिक्षकांत त्याबाबत चर्चा होत आहे. त्यामुळे यंदा या प्रक्रियेबाबत जाणून घेण्याची अनेकांना उत्कंठा दिसत आहे. त्यासाठी बदल्यांसाठी इच्छुकांच्या जि.प.कडे फेऱ्या सुरू झाल्या आहेत. परंतु जि.प.त मात्र वेगळेच चित्र सुरू असल्याने अनेकांचा जीव टांगणीला लागला आहे. शिक्षण विभागाने तर टिपणी लिहून मार्गदर्शन मागविण्याची तयारीही केली होती. मात्र याबाबत सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांच्याशी चर्चा केली असता २0१४ च्या शासन निर्णयात जिल्हा स्तरावर १0 टक्के बदल्यांचे स्पष्ट निर्देश दिले असल्याचे सांगितले. सर्वच प्रकारात जवळपास हाच निकष आहे. तालुकास्तरावर मात्र त्यात बदल आहे. तालुका स्तरावर प्रशासकीय १0 टक्के तर विनंतीवरून ५ टक्के बदल्यांची तरतूद आहे. यंदा बदल्यांबाबत अजून प्रक्रिया सुरू झाली नाही. त्याची माहिती मागविण्यास सांगण्यात येणार आहे. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी निर्णय घेणार आहेत. त्यामुळे आताच बदल्यांबाबत निश्चित काही सांगणे अवघडच दिसत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)पुन्हा अडचण : संचमान्यताच नाहीसंचमान्यता व समायोजन नसल्याने गेल्यावर्षी बदल्यांचे आदेश काढण्यात आले नव्हते. यंदाही अजून याबाबत कोणतीच प्रक्रिया झालेली नाही. संचमान्यतेचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून केले जात आहे. परंतु त्याची काहीच काळजी न घेतल्याने काम ठप्पच असल्याचे दिसून येते.