शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

तु. शं. कुलकर्णी यांना जीवनगौरव

By admin | Updated: August 1, 2016 00:08 IST

औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी परिषदेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ लेखक प्रा. तु. शं. कुलकर्णी यांची निवड करण्यात आली

औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी परिषदेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ लेखक प्रा. तु. शं. कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण ‘मसाप’च्या वर्धापन दिनी २९ सप्टेंबर रोजी नांदेड येथे होईल, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली.‘मसाप’च्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. भास्कर बढे, के. एस. अतकरे, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकरअण्णा मुळे, देवीदास कुलकर्णी, डॉ.आसाराम लोमटे, देवीदास फुलारी, प्रा. सुरेश सावंत, रामचंद्र तिरुके, दगडू लोमटे, रसिका देशमुख, संजीवनी तडेगावकर, डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ.रामचंद्र काळुंखे, विलास सिंदगीकर, संतोष तांबे आदी उपस्थित होते. प्रा. तु. शं. कुलकर्णी यांचे ‘तृणाची वेदना’,‘ग्रीष्मरेखा’, ‘अखेरच्या वळणावर’ हे कथा संग्रह प्रसिद्ध असून ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कविता (१९६०-१९८०)’ या ग्रंथाचे त्यांनी साहित्य अकादमीसाठी संपादन केले आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या ‘प्रतिष्ठान’ या नियतकालिकाचे संपादकपद तु. शं. कुलकर्णी यांनी भूषविले आहे. ‘मसाप’च्या कार्यवाहपदाची त्यांनी पंधरा वर्षे जबाबदारी पार पाडली.नामशेष होणाऱ्या शब्दांचा कोष‘मसाप’च्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात झालेल्या बैठकीत परिषदेच्या वाङ्मयीन उपक्रमाबाबत चर्चा झाली. मराठवाड्याच्या बोलीभाषेतील नामशेष होत जाणाऱ्या शब्दांचा कोष तयार करण्यासाठी या शब्दांचे संकलन व अभ्यासासाठी एक समिती डॉ.शेषराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.कौतिकराव ठाले यांचा अमृतमहोत्सव सोहळा उदगीरलामराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांचा अमृतमहोत्सवी गौरव सोहळा २४ आॅगस्ट रोजी उदगीर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. परिषदेच्या रविवारच्या कार्यकारिणीच्या बैठकीत रामचंद्र तिरुके यांनी ठाले यांचा सत्कार केला. याप्रसंगी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकरअण्णा मुळे, प्रा. किरण सगर, डॉ. दादा गोरे, डॉ. भास्कर बढे, के. एस. अतकरे, देवीदास कुलकर्णी, डॉ. आसाराम लोमटे, देवीदास फुलारी, प्रा. सुरेश सावंत, दगडू लोमटे, रसिका देशमुख, संजीवनी तडेगावकर, डॉ.ऋषिकेश कांबळे, डॉ.रामचंद्र काळुंखे, विलास सिंदगीकर, संतोष तांबे आदी उपस्थित होते.