शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

अंबा कारखाना परिसरात मजुराचा खून

By admin | Updated: December 3, 2015 00:38 IST

अंबाजोगाई: न्यायालयात सुरू असलेल्या कौटूंबिक प्रकरणाच्या तारखेसाठी अंबाजोगाईत आलेल्या बांधकाम मजुराचा मृतदेह अंबा कारखाना परिसरातील

अंबाजोगाई: न्यायालयात सुरू असलेल्या कौटूंबिक प्रकरणाच्या तारखेसाठी अंबाजोगाईत आलेल्या बांधकाम मजुराचा मृतदेह अंबा कारखाना परिसरातील चतुरवाडी शिवारात बुधवारी आढळून आला. हा खून अनैतिक संबंधातून झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.अंकुश मधुकर साठे (वय४०,रा. क्रांतीनगर) असे त्या खून झालेल्या मजुराचे नाव आहेत. अंकुश व त्याच्या पत्नीचा वाद विकोपाला गेला. त्यामुळे अंकुश याची पत्नी त्याला सोडून परभणी तालुक्यातील पिंपळदरी येथे माहेरी रहात आहेत. विभक्त होण्यासाठी त्यांचे प्रकरण अंबाजोगाईच्या न्यायालयात दाखल झालेले आहे. दरम्यान, पत्नी माहेरी असल्याने अंकुशचे शेजारच्या दोन मुले असलेल्या महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले. यानंतर त्यांनी सहा वर्षांपूर्वी लातूर येथे पळून जाऊन संसार थाटला.अंकुशच्या पहिल्या पत्नीसाठीच्या प्रकरणाच्या तारखेसाठी तो दोन दिवसापुर्वी अंबाजोगाईत आला होता. बुधवारी सकाळी अंबा साखर कारखाना परिसरात अंकुश याच मृतदेह आढळून आला. अज्ञात मारेकऱ्यांनी त्याला चतुरवाडी शिवारात नेऊन प्रारंभी गळा आवळून पोटावर, मांडीवर व गुप्तांगावर चाकूचे वार करून खून केला असल्याचे तपासात समोर आले.बुधवारी सकाळी चतुरवाडी शिवारात मृतदेह दिसताच नागरिकांनी ग्रामीण पोलिसांना माहिती दिल्यानंतर उपअधीक्षक निलेश मोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. पी. लाटकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केली. गर्दीतीलच मनोज साठे या तरुणाने आपल्याच भावाचा खून झाल्याचे पोलिसांना सांगितले. यानंतर मनोज साठे याच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध व अज्ञात कारणावरून खून केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. पी. लाटकर करीत आहेत. (वार्ताहर)