शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम रखडले

By admin | Updated: June 21, 2014 00:50 IST

अतुल शहाणे, पूर्णा तालुक्यातील महागाव-निळा शिवारातील पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम निधीअभावी अनेक वर्षांपासून रखडले आहे.

अतुल शहाणे, पूर्णातालुक्यातील महागाव-निळा शिवारातील पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम निधीअभावी अनेक वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे या परिसरातील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.तालुक्यातील महागाव-निळा शिवारातील पूर्णा नदीवर २००९ साली कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कामास सुरुवात झाली. पाच ते सहा वर्षे उलटूनही या बंधाऱ्याचे काम केवळ ८० टक्केच झाले आहे. या बांधकामासाठी शासनाकडून अतिरीक्त निधी उपलब्ध होत नसल्याने बंधाऱ्याचे काम रखडले आहे. बंधाऱ्याची उंची साडेचार मीटर एवढी करण्यात येणार आहे. यामुळे पूर्णा तालुक्यातील ९०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. यामध्ये निळा ४०० हेक्टर, कळगाव १०० हेक्टर, महागाव १०० हेक्टर, कंठेश्वर १०० हेक्टर, आजदापूर १०० हेक्टर तर कानडखेड या परिसरातील काही भाग सिंचनाखाली येणार आहे. तसेच अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी संपुष्टात येणार आहे. परंतु शासनस्तरावरून या कोल्हापुरी बंधाऱ्यासाठी अतिरिक्त निधीची व्यवस्था करता येत नसल्याने हे काम रखडले आहे. पाटबंधारे विभागाचे दुर्लक्षमहागाव-निळा शिवारात कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम ८० टक्के पूर्ण झाले आहे. अद्यापही पिलर, बंधाऱ्याच्या प्लॅपचे काम रखडले आहे. या बांधकामासाठी लागणारे साहित्य धूळखात आहे. निळा ग्रामपंचायतीने या बंधाऱ्याचे उर्वरित बांधकाम तत्काळ करावे, अशी मागणी परभणी पाटबंधारे विभागाकडे दोन वेळा लेखी निवेदन देऊन केले होते. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. लघूपाटबंधारे विभागांतर्गत या बंधाऱ्यास नाबार्डमार्फत दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. सध्या या बंधाऱ्याचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून सुधारित प्रस्तावित मंजुरीसह शासनाकडून अतिरिक्त निधी उपलब्ध झाल्यास या बंधाऱ्याचे काम पूर्ण होईल. पाण्याचा उपयोग होईनापूर्णा तालुक्यातून वाहणारी पूर्णा नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. परंतु बंधाऱ्यात दीड ते दोन कि.मी. अंतरावर कंठेश्वर परिसरात गोदावरी नदीच्या पात्रात मिळते. परंतु या बंधाऱ्यात कोल्हापुरी बंधारा नसल्याने पावसाचे पाणी इतर जिल्ह्यात वाहूून जाते. त्यामुळे या पाण्याचा शेतकऱ्यांना उपयोग होत नाही.