शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
5
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
6
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
7
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
8
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
9
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
10
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
11
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
12
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
13
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
14
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
15
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
16
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
17
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
18
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
19
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
20
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

महिला आघाडीला तिकिटे मिळायला हवी होती

By admin | Updated: April 14, 2015 01:06 IST

औरंगाबाद : शिवसेनेतील महिला आघाडीला उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी आक्रमक होऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. महिला आघाडीच्या सदस्यांना उमेदवारी मिळणे गरजेचे होते

औरंगाबाद : शिवसेनेतील महिला आघाडीला उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी आक्रमक होऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. महिला आघाडीच्या सदस्यांना उमेदवारी मिळणे गरजेचे होते, असे मत शिवसेनेच्या आ.नीलम गोऱ्हे यांनी आज येथे व्यक्त केले. मनपा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या आल्या होत्या. युती, बंडखोरी, महिला आघाडी आणि आरक्षणामुळे महिलांना मिळालेल्या उमेदवाऱ्या व निवडून आल्यानंतर त्यांच्या कामकाजाची पद्धत यावर त्यांनी आपले मत व्यक्त केले. महिला आघाडीचा सन्मान ठेवावा, असे पक्षप्रमुख वारंवार सांगतात. यापूर्वीही महिला आघाडीला उमेदवारी दिली; पण साम, दाम, दंड, भेद या नीतीमुळे त्यांचा पराभव झाल्याचा अनुभव आहे. काही ठिकाणी महिला कमी पडतात. परंतु ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांचा सन्मान केला जाईल. युती झाली असली तरी बंडखोरी झाली आहे, यावर त्या म्हणाल्या कार्यकर्त्यांच्या भावना असतात, त्याचा आदर करायचा असतो. परंतु जे सोबत राहतील ते मावळे, उडतील ते कावळे. युती व्हावी, ही जनतेची इच्छा आहे. स्थानिक नेत्यांच्या कुटुंबात उमेदवाऱ्या गेल्या, याप्रकरणी त्या म्हणाल्या, निवडून येण्याच्या क्षमतेवर उमेदवारी दिली जाते. शिवसेनेत बहुतांश तिकिटे सर्वसामान्यांना मिळतात. घराणेशाहीचा अपवाद असतो. मग युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचा विचार केव्हा होणार असे त्या म्हणाल्या. उमेदवारांची यादी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पाहतात. स्थानिकांवर विश्वास ठेवूनच ते निर्णय घेतात. विश्वासाला तडा गेला तर त्यांच्याकडे माफी नाही. एमआयएमला शिवसेनेचे पाठबळ असल्याचा आरोप होत आहे, यावर त्या म्हणाल्या, सेनेच्या विरोधात सर्वांची छुपी युती होत आहे. सेना एमआयएमसोबत कशी असेल?