शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
6
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
7
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
8
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
9
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
10
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
11
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
12
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
13
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
14
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
15
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
16
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
17
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
18
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
19
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
20
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर

जालना जिल्ह्यात वीज पडून महिला ठार; औरंगाबादेत दोन तरुण वाहून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:33 PM

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात शुक्रवारी मुसळधार पावसामुळे सारोळा परिसरातील अंजना नदीला मोठा पूर आला. यात दोघे तरूण वाहून गेले.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात शुक्रवारी मुसळधार पावसामुळे सारोळा परिसरातील अंजना नदीला मोठा पूर आला. यात दोघे तरुण वाहून गेले. यातील एकाला वाचविण्यात यश आले. दुसऱ्या घटनेत जालना जिल्ह्यात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला.कन्नड तालुक्यात सारोळा -नाचनवेल रस्त्यावरील पुलावरून वाहणा-या पुराचा आनंद घेत असताना सत्तार पठाण व सचिन राजू माकवान (३२, रा. सारोळा) हे दोन तरुण वाहून गेले. पोहता येत असल्याने सत्तार हा कडेवर पोहोचला. त्याला नागरिकांनी दोरीच्या सहाय्याने बाहेर काढल्याने तो बचावला. मात्र सचिनला पोहता येत नसल्याने तो पुराच्या प्रवाहात वाहून गेला. पिशोरचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश पवार, जमादार परमेश्वर दराडे, पो.ना. किसन गवळी यांनी गावकºयांच्या मदतीने कोल्हापुरी बंधाºयात शोध घेतला, मात्र रात्रीची वेळ असल्याने सचिन मिळून आला नाही. नदीकाठच्या गावातील पोलीस पाटलांना याबाबत सूचना देण्यात आल्या असून शनिवारी सकाळी पुन्हा शोध घेण्यात येणार असल्याचे सपोनि. पवार यांनी सांगितले. जखमी सत्तारला उपचारासाठी सिल्लोडला हलविण्यात आले आहे.जालना तालुक्यातील गुंडेवाडी परिसरात दुपारी तीनच्या सुमारास वीज पडून सुमनबाई रावसाहेब गजर (४०) या जागीच ठार झाल्या, तर त्यांच्या सोबत असलेली त्यांची मुलगी पूजा रावसाहेब गजर (१७) आणि मोनाबाई मुरलीधर गजर (३५) या गंभीर जखमी झाल्या. पाऊस आल्याने शेतातील काम थांबवून या सर्वजणी झाडाखाली थांबल्या होत्या. जमखींना येथील खासगी रूग्णालयात दाखल केले असून, त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अंबड व परिसरात सायंकाळी सातच्या सुमारास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. जालना तालुक्यातील मानदेवूळगाव व परिसरात तसेच भोकरदन व परिसरातही पावसाने हजेरी लावली.हिंगोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊसहिंगोली जिल्ह्यात अनेक दिवसांपासून शेतकºयांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. अखेर शुक्रवारी रात्री ८. ३० वाजता जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे खरीप पिकास जिवदान मिळाले आहे. तर हिंगोली शहरात रस्ते जलयम झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. शेतकरी मागील आठ दिवसांपासून जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत होते. मात्र उशिरा का होईना मेघ गर्जनेसह झालेल्या पावसाने शेतकºयांना धिर आला आहे. जिल्ह्यात सेनगाव, डोंगरकडा, बासंबा, खुडज, कळमनुरी आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर काही भागात वीज पुरवठाही खंडीत झाल्याने ग्रामस्थांना मात्र रात्र अंधारात काढावी लागली. तर अनेक भागात नदी, नाले दुथडी भरुन वाहत होते. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरुच होता.बीड जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरीबीड : शुक्रवारी सायंकाळी बीड शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दुपारी चारच्या सुमारास शिरूर, धारूर व गेवराई तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे शिरूर शहरातील रस्त्यांवर गटारीचे पाणी वाहून दुर्गंधी पसरली होती. याचा त्रास नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना सहन करावा लागला. ऐन शाळा सुटण्याच्या सुमारास पावसास सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातून वाट काढत घरी जावे लागले. गेवराई येथेही पावसामुळे गटारी तुंबल्या होत्या, तर बस स्थानक परिसरात पाणी साचले होते. जिल्ह्यात १ ते २२ जूनदरम्यान सरासरी ९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ १४ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे.

टॅग्स :Deathमृत्यू