भरधाव टँकरने दुचाकीस्वार महिलेस चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 05:58 PM2019-05-29T17:58:27+5:302019-05-29T18:06:46+5:30

अपघातानंतर चालक पसार झाला.

women death in tanker - two-wheeler accident at Aurangabad | भरधाव टँकरने दुचाकीस्वार महिलेस चिरडले

भरधाव टँकरने दुचाकीस्वार महिलेस चिरडले

googlenewsNext
ठळक मुद्दे टँकरने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. डोक्याला गंभीर मार लागून त्यांच्या नाका-तोंडातून रक्तस्त्राव सुरु झाला. 

औरंगाबाद : भरधाव पाण्याच्या टँकरने दुचाकीस्वार ३४ वर्षीय महिलेस चिरडले.  हा अपघात मंगळवारी (दि. २८) रात्री साडेअकराच्या सुमारास ज्युबली पार्क चौकात घडला. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने जप्त केली असून अपघातानंतर चालक  पसार झाला. ज्योती दिलीप सोनवणे (वय ३४, रा.गल्ली क्र-३,कैलासनगर) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात ठार झालेल्या ज्योती सोनवणे या कन्नड तालुक्यातील पिशोरच्या रहिवासी होत्या. गेल्या काही वर्षापासून त्या औरंगाबादमधील कैलासनगर भागात वास्तव्यास होत्या. मंगळवारी रात्री गावातील एका रुग्णाला भेटण्यासाठी ज्योती सोनवणे या आपला भाचा चंद्रकांत हिवाळे यांच्यासोबत दुचाकीवर ( क्रमांक एमएच २० एई १६१२ ) घाटी रुग्णालयात गेल्या होत्या. नातेवाईक रुग्णाची भेट घेतल्यानंतर घराकडे परत निघाल्या असता ज्युबली पार्क चौकात भरधाव जात असलेल्या पाण्याचा टँकरने ( एमएच २१ एएन ०८४८ ) दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. दुचाकीवरुन खाली पडल्याने ज्योती यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांच्या नाका-तोंडातून रक्तस्त्राव सुरु झाला. 

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ज्योती सोनवणे यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. पोलिसांनी घटनास्थळावरुन पाण्याचा टँकर ताब्यात घेतला आहे. अपघातानंतर टँकर चालकाणे घटनास्थळी टँकर सोडून पळ काढला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात टँकर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक राजश्री आडे करीत आहेत.

Web Title: women death in tanker - two-wheeler accident at Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.