शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

ठपका नसताना निलंबन का?

By admin | Updated: June 10, 2014 00:34 IST

बीड: डीसीसी बँकेतील व्यवहाराप्रकरणी कोल्हापूर येथील सहनिबंधक चौघुले यांच्या तपासणी अहवालात तत्कालिन प्रशासा शिवानंद टाकसाळे यांच्यावर ठपका ठेवलेला नाही,

बीड: डीसीसी बँकेतील व्यवहाराप्रकरणी कोल्हापूर येथील सहनिबंधक चौघुले यांच्या तपासणी अहवालात तत्कालिन प्रशासा शिवानंद टाकसाळे यांच्यावर ठपका ठेवलेला नाही, तरीही त्यांचे निलंबन का केले? असा प्रश्न विचारत सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हा कचेरीवर निदर्शने केली.याप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले. येथील अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्याकडे बीड जिल्हा बँकेचा पदभार होता. बँकेतील ठेवी वाटपात अनियमितता केल्यावरून टाकसाळे यांच्या निलंबनाची घोषणा विधान परिषदेत सहकारमंत्र्यांनी केली आहे. याविरोधात जिल्ह्यातील सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहाकारमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. अप्पर जिल्हाधिकारी टाकसाळे यांच्याकडे जिल्हा बँकेचा प्रशासक पदाचा पदभार असताना त्यांनी २५० कोटीची वसुली केली. यासह बँकेचे कर्ज वेळेवर न फेडल्याप्रकरणी आमदारांवर फौजदारी गुन्हेदेखील दाखल केलेले आहेत. ज्या आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. तसेच जे आमदार जिल्हा बँक प्रकरणात आरोपी आहेत. त्यांच्या म्हणण्यावर अप्पर जिल्हाधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे. हे अत्यंत चुकीचे असून ज्या आमदारांवर डीसीसी बँकप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणीदेखील यावेळी निदर्शनकर्त्यांनी केली आहे.यावेळी अभय मगरे, भगवान कांडेकर, सत्यशोधक ओबीसी परिषदेचे हनुमंत उपरे, सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे, अ‍ॅड. राहुल मस्के, अजय सवाई, अ‍ॅड. सुरेश वडमारे, अ‍ॅड. अविनाश गंडले, अ‍ॅड. सिदार्थ शिंदे, बबन वडमारे, गणेश वाघमारे, अंकुश निर्मळ, नाना मस्के, अमोल पारवे, तत्वशिल कांबळे, महेश गायकवाड, सुर्यकांत जोगदंड, माणिक वाघमारे आदींची उपस्थिती होती. यावेळी निदर्शनकर्त्यांनी महापुरूषांची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करण्याचीदेखील मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.(प्रतिनिधी)