शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात शिक्षकांचा आमदार काेण? पुन्हा विक्रम काळे की होणार बदल, मतमोजणी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 12:05 IST

१४ उमेदवारांमुळे बहुरंगी लढत, ३०० मतपेट्यांत ५३ हजार २५७ मतदारांचा कौल

औरंगाबाद : शिक्षकांचा आमदार कोण होणार, याचा फैसला आज होणार आहे. आठ जिल्ह्यातील ५३ हजार २५७ शिक्षकांनी नेता निवडीसाठी मतदान केले असून, १४ उमेदवारांमुळे बहुरंगी झालेल्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चिकलठाण्यातील कलाग्रामसमोरील मराठवाडा रिअल्टर्स प्रा.लि. या कंपनीच्या शेड्समध्ये सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे.

मतमोजणीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बुधवारी (दि.१) मतमोजणीच्या ठिकाणीच दुसरे प्रशिक्षण शिबीर झाले. मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणी कक्ष, निरीक्षक कक्ष, सुरक्षा कक्ष, माध्यम कक्ष, केंद्रावरील टेबल रचना, प्रकाश व्यवस्था, विद्युतपुरवठा, आरओ, एआरओ बैठक व्यवस्था, उमेदवारांसाठी बैठक व्यवस्था, तसेच आवश्यक त्या कक्षांची विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आढावा घेतला.

अशी होणार मतमोजणी.....५६ टेबलवर मतमोजणी होणार आहे. यासाठी ७०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सुरुवातीला सर्व मतपेटीतील मते एका हौदात टाकण्यात येतील. त्यानंतर, सर्व मतपत्रिकांची सरमिसळ करण्यात येईल. यातून २५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा, याप्रमाणे ४० गठ्ठे अशी एक हजार मते प्रत्येक टेबलवर देण्यात येतील. या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्यात येईल. एकूण वैध मतांप्रमाणे कोटा निश्चित करण्यात येईल. त्यानंतर मतांच्या फेऱ्या सुरू होतील. या सगळ्या प्रक्रियेला पूर्ण दिवस लागू शकतो, अशी शक्यता निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांनी वर्तविली.

उमेदवारांमध्ये धाकधूक.....भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीसह मराठवाडा शिक्षक संघ व अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतमोजणीपूर्वी सर्वांची धाकधूक वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ.विक्रम काळे, भाजपकडून प्रा.किरण पाटील, वं.ब.आघाडीकडून कालिदास माने, तर मराठवाडा शिक्षक संघाकडून सूर्यकांत विश्वासराव, अपक्ष प्रदीप सोळुंके, मनोज पाटील, संजय तायडे, कादरी शाहेद अब्दुल गफूर, अनिकेत वाघचवरे, नितीन कुलकर्णी, विशाल नांदरकर, प्रा.अश्विनकुमार क्षीरसागर, आशिष देशमुख, ज्ञानोबा डुकरे यांनी निवडणूक लढविली. यावेळी १४ तर २०१७ साली २० उमेदवार निवडणूक मैदानात होते. प्रमुख लढत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप, शिक्षक संघाच्या उमेदवारांत झाली आहे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाTeacherशिक्षकVidhan Parishadविधान परिषदAurangabadऔरंगाबाद