नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेले अन् सराफा दुकानात आग; लाखो रुपयांचे सोने-चांदी खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 19:44 IST2026-02-06T19:43:37+5:302026-02-06T19:44:06+5:30

नातेवाइकाच्या मृत्यूचं दुःख अन् जळत्या दुकानाची आग; मुकुंदवाडीत एका व्यावसायिकावर कोसळली कुऱ्हाड.

Went for a relative's funeral and a bullion shop was set on fire; Gold and silver worth lakhs of rupees were burnt in Mukundwadi | नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेले अन् सराफा दुकानात आग; लाखो रुपयांचे सोने-चांदी खाक

नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेले अन् सराफा दुकानात आग; लाखो रुपयांचे सोने-चांदी खाक

छत्रपती संभाजीनगर : नातेवाइकाचे निधन झाल्याने दुकान बंद करून अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या सराफा व्यावसायिकाच्या दुकानाला आगीने वेढा घातला. गुरुवारी सायंकाळी ५:३० वाजता मुकुंदवाडी परिसरात ही घटना घडली. आगीत दुकानातील सर्व नोंदवह्या जळून खाक झाल्याने नुकसानीचा आकडा स्पष्ट झाला नाही. मात्र, लाखो रुपयांचे चांदी व सोन्याचे दागिने यात जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सुधीर बुऱ्हाडे यांचे मुकुंदवाडीतील मुख्य बाजारपेठेत विजय परमेश्वरी यांच्या इमारतीमध्ये सोने-चांदीच्या दागिन्यांचे खरेदी-विक्रीचे दुकान आहे. गुरुवारी दुपारी बुऱ्हाडे नेहमीप्रमाणे दुकानात उपस्थित होते. दुपारी त्यांच्या नातेवाइकाचे निधन झाल्याने साधारण दुपारी ३ वाजेच्या सुमारास बुऱ्हाडे दुकान बंद करून अंत्यसंस्कारासाठी गेले. ५ वाजेच्या सुमारास दुकानातून अचानक धूर येत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती कळताच अग्निशमन विभागाचे अधिकारी चेतन तरोळे, सोमीनाथ भोसले, जवान अशोक वेलदवडे, विशाल निंबाळकर, माधव गाडे, किरण शेलार, नंदकुमार आरक, राजू राठोड, कृष्णा भागवत यांनी धाव घेतली. साधारण तासाभराच्या परिश्रमानंतर आग नियंत्रणात आली. मात्र, तोपर्यंत दुकानातील दागिने, फर्निचर, नोंदवह्या जळून खाक झाल्या.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा सेटअप बदलला
सर्वाधिक आग सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या डीव्हीआरजवळ आढळून आली. बुऱ्हाडे यांनी दाेन दिवसांपूर्वी दुकानातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा सेटअप बदलला होता. यात वायरिंगचाही समावेश होता. तेथेच शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. डागडुजी, दुरुस्तीसाठी काही ग्राहकांचे सोने दुकानात होते. चांदीचे दागिने अधिक होते. आगीत नोंदवह्या, बिले जळून खाक झाल्याने नुकसानीचा आकडा सांगता येणार नाही, असे बुऱ्हाडे यांनी ‘लोकमत’सोबत बोलताना सांगितले.

Web Title : अंतिम संस्कार के लिए गए रिश्तेदार, दुकान में लगी आग, सोना-चांदी राख

Web Summary : एक रिश्तेदार के अंतिम संस्कार में शामिल होने गए जौहरी की दुकान में आग लग गई। सीसीटीवी प्रणाली के पास शॉर्ट सर्किट से आग लगने का संदेह है। आग से सोना, चांदी, फर्नीचर और रिकॉर्ड नष्ट हो गए, जिससे लाखों का नुकसान हुआ।

Web Title : Funeral Visit Turns to Tragedy: Fire Engulfs Jewelry Store

Web Summary : A jewelry store owner attending a relative's funeral returned to find his shop engulfed in flames. The fire, suspected to be caused by a short circuit near the CCTV system, destroyed gold, silver, furniture, and records, resulting in losses estimated in lakhs.