खुलताबाद : श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी, तसेच शनिवार व रविवारची सलग सुट्टी असल्यामुळे जगप्रसिद्ध वेरूळ लेणी पाहण्यासाठी पर्यटक व भाविकांनी मोठी गर्दी केल्याने वेरूळनगरी दुमदुमली. उद्या पहिलाच सोमवार असल्याने अजून गर्दी वाढणार आहे.रविवारपासून पवित्र श्रावण मासास प्रारंभ झाला. वेरूळ येथील घृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी पहाटेपासून राज्यातील, तसेच परराज्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर तर भाविकांची तोबा गर्दी झाल्याने दर्शनासाठी एक ते दोन तास लागत होते.हर हर महादेव, बम बम भोले, ओम नम: शिवायचा जयघोष करीत भाविक दर्शन घेत होते. घृष्णेश्वर देवस्थानचे अध्यक्ष संजय वैद्य, कार्यकारी अध्यक्ष योगेश टोपरे व विश्वस्त भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून लक्ष ठेवून होते.श्रावणाच्या पहिल्याच दिवशी भाविकांची गर्दी पाहून सर्व व्यवस्था कोलमडल्या होत्या. पोलीस प्रशासन व मंदिर देवस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी चोख बंदोबस्त ठेवला. काही वेळा औरंगाबाद-कन्नड मार्गावर मंदिराजवळील रस्त्यावर ट्रॅफिक जाम होण्याचे प्रकार घडले. त्यामुळे भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला.वेरूळ लेणी धबधबा शांतपावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले आहेत. अद्याप म्हणावा तसा पाऊस न झाल्याने वेरूळ लेणीचा धबधबा अजूनही शांत आहे. त्यामुळे वेरूळ लेणी पाहण्यासाठी आलेल्या देशी, विदेशी पर्यटकांचा हिरमोड झाला. (वार्ताहर)वेरूळ लेणीत पर्यटकांची संख्या वाढली गेल्या अनेक महिन्यांपासून वेरूळ लेणीत पर्यटकांची गर्दी होत नव्हती; परंतु गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसाने वेरूळ लेणी परिसर हिरवाईने नटला आहे. त्यातच शनिवार व रविवार सलग सुट्टीमुळे वेरूळ लेणी पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. लेणी परिसरातील वाहन तळात वाहन लावण्यास जागा नसल्याने पर्यटकांना बाहेर रस्त्यावर वाहने उभी करावी लागली. पर्यटकांच्या गर्दीने लेणी परिसर फुलला होता. व्यावसायिकांचा व्यवसायही चांगला झाल्याने सर्व खुश होते.
वेरूळात श्रावणाचे स्वागत
By admin | Updated: July 28, 2014 01:05 IST
खुलताबाद : श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी, तसेच शनिवार व रविवारची सलग सुट्टी असल्यामुळे
वेरूळात श्रावणाचे स्वागत
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}