शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसोहळ्यात हाणामारी

By admin | Updated: May 26, 2014 00:57 IST

औंढा नागनाथ : तालुक्यातील गोजेगाव येथे लग्नसोहळा पार पडल्यानंतर एका युवतीची छेड काढल्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली.

औंढा नागनाथ : तालुक्यातील गोजेगाव येथे लग्नसोहळा पार पडल्यानंतर एका युवतीची छेड काढल्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात वºहाडींना काठ्या- कुºहाडी, गजाने मारहाण झाली असून एक चारचाकीसह आॅटोरिक्षावर हल्ला करून तोडफोड करण्यात आली. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. कल्याण फत्रीपूर- साकी नाका येथील रमाकांत नरवाडे याचा विवाह २५ मे रोजी सकाळी ११ वाजता गोजेगाव येथील खिल्लारे कुटुंबातील युवतीसोबत आयोजित करण्यात आला होता. लग्नाला उशीर होवून दुपारी २.३० वाजता पार पडले. त्यानंतर लग्नमंडपामध्ये जेवणाच्या पंगती सुरू असताना गावातील दोघांंनी नवरदेवाकडील युवतीची छेड काढली. हा प्रकार समजल्यानंतर सदरील युवतीच्या भावाने त्याबाबत संबंधितांकडे विचारणा केली असता गावातील लोकांनी त्याला जबर मारहाण केली. त्यानंतर वºहाडी मंडळी आणि ग्रामस्थ यांच्यात हाणामारीचा प्रकार घडला. दरम्यान, नवरदेवाकडील काहीजण जीप क्र. एम. एच. ०५- एएस ७५१ व एका आॅटोरिक्षातून जात असताना जमावाने त्यांच्यावर पुन्हा हल्ला चढविला. यात काठ्या, कुºहाडी, गज हातात घेवून आलेल्या जमावाने वºहाडींना बेदम मारहाण करून दोन्ही वाहनांची तोडफोड केली.यात जवळपास ५० वºहाडी जखमी झाले असून यातील गौतम फुलोरे (२५ रा. कल्याण), अनुराग अशोक पाटील (२५, औरंगाबाद), ज्ञानेश्वर रामप्रसाद नरवाडे (१८, जालना), प्रियंका चंद्रकांत नरवाडे (२१, कल्याण), विद्या रामप्रसाद नरवाडे (१५, जालना), वैभव आसाराम नरवाडे (२१, कल्याण), प्रशांत ज्ञानदेव सपकाळ (२२, कल्याण) यांना गंभीर दुखापत झाल्याने औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश वाकळे यांनी जखमींवर उपचार केले. घटनेबाबत माहिती मिळताच ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश मोरे, औंढा ठाण्याचे पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, जमादार नुरखाँ पठाण, शंकर इंगोले, रुपेश गरुड, भीमराव चिंतारे यांनी गोजेगाव येथे धाव देवून जखमींना दवाखान्यात नेले. या प्रकरणी आरोपी राजू भगवान जायभाय व सुभाष जायभाय यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. (वार्ताहर)लग्नमंडपामध्ये जेवणाच्या पंगती सुरू असताना गावातील दोन युवकांनी नवरदेवाकडून आलेल्या युवतीची छेड काढली युवतीच्या भावाने त्याबाबत संबंधितांकडे विचारणा केली असता गावातील लोकांनी त्याला जबर मारहाण केली वºहाडींनाही मारहाण झालीनवरदेवाकडील काहीजण चारचाकी वाहनातून जात असताना जमावाने त्यांच्यावर पुन्हा हल्ला चढविला मारहाणीत जवळपास ५० वºहाडी जखमी झाले असून सात जणांंना गंभीर दुखापत झाल्याने औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनेबाबत माहिती मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचारी गावात पोहोचले या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परंतु रविवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद नव्हता दोन जखमींना पुढील उपचारासाठी परभणीला हलविले