शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीमुळे शस्त्रे 'म्यान' !

By admin | Updated: September 16, 2014 01:33 IST

बीड : महाराष्ट्र विधानसभा सर्वात्रिक निवडणुकांसाठीची आदर्श आचारसंहिता १२ सप्टेंबरपासून लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शस्त्र बाळगण्यास निर्बंध घातले

बीड : महाराष्ट्र विधानसभा सर्वात्रिक निवडणुकांसाठीची आदर्श आचारसंहिता १२ सप्टेंबरपासून लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शस्त्र बाळगण्यास निर्बंध घातले असून शस्त्र परवानाधारकांनी संबंधित पोलीस ठाण्यात शस्त्रे जमा करण्याचे आदेश नवल किशोर राम यांनी दिले आहेत. सार्वत्रिक निवडणुक व बीड लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.सदर निवडणुका शांततेत, निर्भयपणे व खुल्या वातावरणात पार पाडण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागू झालेल्या दिनांकापासून शस्त्रे बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.निवडणूक काळात शस्त्रांचा गैरवापर केला जाऊ शकतो. या अनुषंगाने या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात १ हजार ४१५ परवाना धारक आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील सदर निवडणुकांचा प्रभाव असलेल्या क्षेत्रातील शस्त्र परवानाधारकांची शस्त्रे निवडणूक आचारसंहिता कालावधीसाठी जमा करुन घेणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी शस्त्रे जमा करुन घ्यावीत असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.बँक, संस्था, विद्युत केंद्र व इतर महत्त्वाच्या कार्यालयाच्या सुरक्षेसाठी देण्यात आलेल्या परवान्यावरील शस्त्रे वगळता इतर सर्वांना संबंधीत पोलीस ठाण्यात शस्त्रे जमा करावी लागणार आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर शस्त्रे परत देण्यात येणार आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी राम यांनी अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांना सदरील आदेश दिले असून तात्काळ कार्यवाही करण्याचे सांगितले आहे. कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा लागणार आहे. जे परवानाधारक संबंधित पोलीस ठाण्यास शस्त्रे जमा करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होणार आहे. पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी संबंधित ठाणे प्रमुखांना याबाबत सोमवारी सांयकाळी सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)