शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा संपताच जिल्हा टँकरच्या वाटेवर

By admin | Updated: October 10, 2014 00:42 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद महिनाभरापूर्वीच टँकरमुक्त झालेल्या जिल्ह्याची वाटचाल पुन्हा एकदा टँकरच्या दिशेने सुरू झाली आहे. पावसाळा संपताच जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणीटंचाई जाणवू लागली आहे

सुनील कच्छवे, औरंगाबादमहिनाभरापूर्वीच टँकरमुक्त झालेल्या जिल्ह्याची वाटचाल पुन्हा एकदा टँकरच्या दिशेने सुरू झाली आहे. पावसाळा संपताच जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातून टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्याने गतवर्षी भीषण दुष्काळ अनुभवला. जिल्ह्यातील शेकडो गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या गावांची तहान भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर टँकर सुरू केले होते. मेअखेरीस टँकरची संख्या तीनशेच्या पुढे गेली. जून महिन्यात पाऊस पडल्यानंतर टँकर बंद होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, संपूर्ण जून महिना कोरडा गेला. त्यामुळे टँकरची संख्या आणखीनच वाढली. जुलै महिन्यातही जिल्ह्यात सुमारे अडीचशे गावांना ३३३ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. आॅगस्ट महिन्यात मात्र बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे आॅगस्टअखेरीस जिल्ह्यातील टँकर पूर्णपणे बंद झाले; परंतु त्यानंतरही पावसाची अवकृपा कायम राहिली. त्यामुळे आता पावसाळा संपल्यानंतर पुन्हा एकदा पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे तहसील कार्यालयांकडून ठिकठिकाणी टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पैठण तहसील कार्यालयाकडून टँकरचे काही प्रस्ताव नुकतेच प्राप्त झाले आहेत. तालुक्यातील कमी पाऊस झालेल्या मंडळांमध्ये टंचाई जाणवत आहे. त्यामुळे पाच गावांमध्ये पाच टँकर सुरू करावेत, अशी मागणी या प्रस्तावांतून करण्यात आली आहे.