पाणलोटच्या कामांत अपहार; चौकशीची मागणी

By Admin | Updated: May 21, 2014 00:48 IST2014-05-21T00:40:46+5:302014-05-21T00:48:02+5:30

औंढा नागनाथ : तालुक्यामध्ये केंद्रीय पाणलोट विकास कार्यक्रमामध्ये कृषी सहाय्यक व समितीचा माध्यमातून लाखों रुपयांचा अपहार झाला

Watershed in the watershed; Inquiry demand | पाणलोटच्या कामांत अपहार; चौकशीची मागणी

पाणलोटच्या कामांत अपहार; चौकशीची मागणी

औंढा नागनाथ : तालुक्यामध्ये केंद्रीय पाणलोट विकास कार्यक्रमामध्ये कृषी सहाय्यक व समितीचा माध्यमातून लाखों रुपयांचा अपहार झाला असल्याची तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे नुकतीच करण्यात आली आहे. औंढा नागनाथ तालुक्यांमधील सुमारे ३० गावांची निवड पाणलोट विकास कार्यक्रमासाठी करण्यात आली होती. या गावांची निवड केंद्र शासनाने शासन स्तरावर केलेली असते. यामध्ये प्रत्येक गावाला सुमारे २० लाख रुपयांचा निधी थेट केंद्र शासनाकडून ग्रामपंचायतींच्या नावे बँकेत असलेल्या खात्यांवर आरटीजीएसद्वारे जमा होतो. हा निधी खर्च करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर पाणलोट विकास समितीच्या स्थापना करण्यात आल्या. यावर तांत्रिक मार्गदर्शनासाठी कृषी सहाय्यक व सेवक त्या समितीवर असतो. यामध्ये शेतामध्ये मातीनाला बांध, दगडी बांध, सलग समचर तळ, खड्डे, अशीे विविध कामे पाणी आडविण्यासाठी सन २०१२-१३ मध्ये करण्यात आली. सदर कामे या समितीने न करता कृषी सेवकांनी आपल्या मर्जीतील ठेकेदारांशी संगणमत करून सदरील कामे निकृष्ट दर्जाची केली आहेत. या कामांमध्ये लाखों रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, त्याच्या चौकशीची मागणी अनिल सुरदुसे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन ग्रामपंचायत स्तरावर पाणलोट विकास समितीने निधी खर्च न करता कृषी सेवकांनी आपल्या मर्जीतील ठेकेदारांशी संगणमत करून सदरील कामे निकृष्ट दर्जाची केली आहेत. त्यातून लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचा अनिल सुरदुसे यांचा आरोप.

Web Title: Watershed in the watershed; Inquiry demand