पाणलोट विकास कागदावरच; निधी हडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 23:27 IST2016-04-25T23:13:26+5:302016-04-25T23:27:00+5:30
मंठा : तालुक्यातील कीर्तापूर येथे कृषी विभागामार्फत एकात्मिक पाणलोट विकास कार्य्रमातंर्गत बांधबंधिस्तीची क ामे अपूर्ण असून,

पाणलोट विकास कागदावरच; निधी हडप
मंठा : तालुक्यातील कीर्तापूर येथे कृषी विभागामार्फत एकात्मिक पाणलोट विकास कार्य्रमातंर्गत बांधबंधिस्तीची क ामे अपूर्ण असून, कामे मोठ्या प्रमाणात कागदोपत्री दाखवून निधी हडपण्यात आला. याबाबत माहिती अधिकार २००५ अन्वये अपूर्ण व दिशाभूल करणारी माहिती दिल्याची तक्रार खुशाल दत्तराव ईघारे यांनी विभागीय आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
कीर्तापूर येथे २०१३ - १४ मध्ये कृषी विभागामार्फत एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत बांधबराशी क ामे हाती घेण्यात आली होती. यामध्ये शेतक ऱ्यांच्या शेतातील माती ट्रॅक्टरच्या साह्याने बांधावर लोटून बांध घालून शेतात ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हे शासनाचे धोरण होते. अतिरिक्त पाणी शेतात साचल्यानंतर बांध फुटू नये म्हणूनपाईप टाकून पाणी बाहेर क ाढले जात होते. मात्र, सदरची कामे क ाही गटात क रण्यात आली. ही कामेही थातूरमातूर व पाईप न टाक ता के ली होती. अन्य गटांत कामे न करताच कागदोपत्री दाखवून मोठ्या प्रमाणात निधी हडपण्यात आला. याबाबत २३ जून २०१५ रोजी माहिती अधिकार २००५ अन्वये कि र्तापूर येथे २०१३-१४ मध्ये कि ती मीटर कामे झाली, त्याचे बजेट कितीे, पैसे किती उचलले व बाकी किती आहे. ही माहिती मागितली असता, ४ जुलै २०१५ रोजी कृ षी विभागाने सदर माहिती उपलब्ध करून देण्यास मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ खर्च होणार असल्याचे पत्र देऊ न माहिती देण्याचे टाळले
आहे.
त्यानंतर दि. ९ जुलै रोजी कृषी विभागाने पुन्हा पत्र देऊ न एक ा वेळेस एक ा क ामाची विचारल्यास बरे होईल, असे उत्तर दिले. त्यानंतर २५ जानेवारी २०१६ रोजी मंठा येथील कृषी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले असता, मागितलेली माहिती दिली जाईल, असे आश्वासन तालुक ा कृ षी अधिकाऱ्यांनी दिल्याने ते मागे घेतले. त्यानंतर ८ फेब्रुवारी २०१६ रोजी माहिती दिली. मात्र, सदर अपूर्ण व दिशाभूल करणारी होती. त्यामुळे संपूर्ण कामाची चौकशीची मागणी करण्यात आली.
अपूर्ण व दिशाभूल करणारी माहिती देण्याऱ्या विरुध्द कडक करवाई अशी तक्रार खुशाल दत्तराव ईघारे यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे १८ मार्च रोजी दिलेल्या निवेदनाव्दारे के ली आहे. (वार्ताहर)