शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

‘तेरणा, वाघोली’तूनही पाणी उपसा

By admin | Updated: November 7, 2014 00:41 IST

तेर : येथील तेरणा प्रकल्पामध्ये सध्या केवळ १० ते १५ टक्के इतका अत्यल्प पाणीसाठा असतानाही प्रकल्पातून शेतीसाठी पाणीउपसा होत आहे.

तेर : येथील तेरणा प्रकल्पामध्ये सध्या केवळ १० ते १५ टक्के इतका अत्यल्प पाणीसाठा असतानाही प्रकल्पातून शेतीसाठी पाणीउपसा होत आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी या धरणावर अवलंबून असलेल्या गावांना टंचाईचे चटके सोसावे लागणार आहेत.यंदा तेरणा धरण क्षेत्र परिसरामध्ये अत्यल्प पावसामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. दरम्यान, या धरणातून तेर, ढोकी, तडवळा आणि येडशी या चार गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु, सध्या या प्रकल्पामध्ये अवघा १० ते १५ टक्के इतका अत्यल्प पाणीसाठा आहे. असे असतानाच धरण परिसरातील शेतकरी विशेषत: रात्रीच्यावेळी शेतीसाठी पाणीऊपसा करीत आहेत. असाच पाणीउपसा सुरू राहिल्यास भविष्यात उपरोक्त चारही गावांना भीषण तोंड द्यावे लागणार आहे. दरम्यान, हा प्रश्न लक्षात घेवून ग्रामपंचायतीने ३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून अनधिक्रतपणे सुरू असलेला पाणीउपसा थांबविण्याची मागणी केली आहे. परंतु, अद्यापही धरणक्षेत्रातील वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला नाही. याबाबत शाखा अभियंता आय. पी. बांगड यांच्याशी संपर्क साधला असता वीजपुरवठा खंडित करण्याबाबत महावितरणला पत्र दिल्याचे सांगितले आहे. (वार्ताहर)तेर : तालुक्यातील वाघोली येथील मध्यम प्रकल्पामध्ये सध्या बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. परंतु, येथेही मोटारींचे मोठे जाळे दिसून येत आहे. भविष्यातील टंचाईचे चित्र लक्षात घेवून शेतीसाठी पाणीउपसा करू नये, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. परंतु, येथेही बेसुमार पाणीउपसा सुरू असून, तो तसाच सुरू राहिल्यास भविष्यात परिसरातील गावांनाही टंचाईचे चटके सोसावे लागणार आहेत. जिल्ह्यात चालू वर्षी सरासरीपेक्षा कमीच पाऊस पडला आहे. परिणामी आतापासूनच अनेक गावांना टंचाईचे चटके बसू लागले आहेत. त्यामुळे ज्या प्रकल्पांमध्ये पाणी आहे, ते पिण्यासाठी आरक्षित करण्याची गरज निर्माण झाली आहे. असे असतानाही सध्या या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात खुलेआम पाणीउपसा करण्यात येत आहे. असे असतानाही कारवाईचे धाडस प्रशासनाकडून दाखविले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.