शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजना १९६ कोटींचीच

By admin | Updated: April 15, 2016 01:46 IST

परभणी : युआयडीएसएसएमटी पाणीपुरवठा योजनेची २००६-०७ च्या दरसुचीनुसार मूळ किंमत १०४ कोटी रुपये होती़ या योजनेची निविदा अंतीम करतेवेळेस

परभणी : युआयडीएसएसएमटी पाणीपुरवठा योजनेची २००६-०७ च्या दरसुचीनुसार मूळ किंमत १०४ कोटी रुपये होती़ या योजनेची निविदा अंतीम करतेवेळेस २००९ ते २०११ या काळात दर सुचीतील फरकामुळे या योजनेच्या रकमेत वाढ होवून योजनेची किंमत १९६़२२ कोटी रुपयेच झाली असल्याचा खुलासा मनपा आयुक्त राहुल रेखावार यांनी केला आहे़ ९ एप्रिल रोजी ‘लोकमत’ने ‘योजनेतील दिरंगाईमुळे ८२ कोटींचा भुर्दंड’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते़ या वृत्ताच्या अनुषंगाने महापालिकेचे आयुक्त राहुल रेखावार यांनी ‘लोकमत’कडे खुलासा पाठविला आहे़ या संदर्भात पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, युआयडीएसएसएमटी पाणीपुरवठा योजनेची मूळ किंमत १०४ कोटी रुपये असली तरी २००६-०७ च्या दरसुचीनुसार ती मंजूर किंमत होती़ शासनाने २००८ मध्ये योजनेला मंजुरी दिली़ २००९ मध्ये निविदा प्रक्रिया सुरू झाली़ निविदा अंतीम करेपर्यंत २००९ ते २०११ या काळात दरसुचीच्या फरकामुळे रकमेच्या किंमतीत वाढ होवून ती १९६़२२ कोटी झाली़ त्याप्रमाणे शासनाने मान्यता दिली व निधीही वितरित करण्यात आला आहे आणि या मंजूर रकमेच्या आधीन राहूनच कंत्राटदाराकडून कामे करून घेण्यात येत आहेत़ कोणत्याही प्रकारची दरवाढ किंवा वाढीव रक्कम अदा केली नाही़ त्यामुळे योजनेची किंमत २२२ कोटीपर्यंत गेली, असे म्हणणे चुकीचे आहे़ शासनाकडून मागणी केलेली १७ कोटी रुपयांची रक्कम दरसुचीतील फरकाची व मंजूर रक्कमेपैकी असल्याने या रकमेस वाढीव रक्कम म्हणता येणार नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे़ २०१३-१४ मधील लेखापरिक्षणात उपस्थित केलेल्या मुद्यांची पूर्तता करण्यात आली असून, करण्यात आलेल्या दोन भागांची मान्यता तत्कालीन आयुक्त व संचालक नगरपालिका प्रशासन संचालनालय यांच्याकडून घेण्यात आलेली आहे़ दोन्ही भागांच्या रकमेस शासनाने मान्यता दिली आहे़ हायड्रोलिक टेस्टिंगकरीता मनपाने कंत्राटदाराची रक्कम राखून ठेवलेली असून, हायड्रोलिक टेस्टिंग पूर्ण झाल्याशिवाय ही रक्कम अदा करण्यात येणार नाही़ त्यामुळे ही टेस्टिंग न करता कंत्राटदाराचे बिल अदा करण्यात आले, असे म्हणणे चुकीचे आहे़, असेही खुलाशात नमूद करण्यात आले आहे़ योजनेबाबत वेळोवेळी आवश्यक त्या तांत्रिक बदलाची परवानगी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून घेतली आहे़ प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे़ त्यांच्या मार्गदर्शनानुसार, कामे केली जातात़ साहित्य खरेदी देखील अंदाजपत्रकानुसार, आयएसआय मानांकनानुसार असून, त्याची त्रयस्त शासकीय समितीकडून चाचणी करण्यात आली आहे़ जलशुद्धीकरण केंद्राची जागाही निश्चित केली असून, नवीन पाणीपुरवठा योजना लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न मनपा करीत आहे़, असेही आयुक्तांनी या खुलाशात स्पष्ट केले आहे़ (प्रतिनिधी)