शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्रांत पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: December 2, 2014 00:43 IST

संजय तिपाले ,बीड जिल्ह्यातील पाणीटंचाईचा फटका केवळ गावानांच बसला आहे असे नाही तर ग्रामीण आरोग्याचा कणा मानल्या जाणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही झळ पोहोचली आहे़

संजय तिपाले ,बीडजिल्ह्यातील पाणीटंचाईचा फटका केवळ गावानांच बसला आहे असे नाही तर ग्रामीण आरोग्याचा कणा मानल्या जाणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही झळ पोहोचली आहे़ पाण्याअभावी ५० पैकी तब्बल ३८ आरोग्य केंद्रांमध्ये रूग्णसेवेत अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत़ त्यामुळे जिल्हा परिषदेने सुमारे ५७ लक्ष रूपयांच्या कूपनलिकांचा प्रस्ताव शासनाकडे ठेवला आहे़जिल्ह्यात ५० प्राथमिक आरोग्य केंद्रे असून या अंतर्गत येणाऱ्या दोन हजारांवर गावांना आरोग्य सुविधा पुरविली जाते़ मात्र आरोग्य केंद्रे उभारताना बहुतांश ठिकाणी पाण्याची सोय करण्यात आली नव्हती़ काही ठिकाणी पर्यायी व्यवस्था केली होती़ जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यामुळे पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे़ अशा परिस्थितीत आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना देखील पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ या पार्श्वभूमीवर आरोग्य केंद्रांमध्ये कायमस्वरूपी पाण्याची सुविधा व्हावी, यासाठी ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नवीन बोअरवेल घेण्यात येणार आहेत़ त्यासाठी प्रत्येकी दीड लाख रूपयांप्रमाणे एकूण ५७ लक्ष रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे़ पाणी सुविधेचा हा प्रस्ताव जि़ प़ च्या आरोग्य विभागाने सीईओ नामदेव ननावरे यांच्यामार्फत कुटुंब कल्याण आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या संचालकांकडे ठेवला आहे़ या प्रस्तावाला मंजुरी मिळताच पाणीटंचाईचा प्रश्न निकाली लागणार आहे़ रूग्णांची अडचण होऊ नये म्हणून तात्पुरती व्यवस्था असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे यांनी सांगितले़या केंद्रांमध्ये आहे पाणीटंचाईकेज तालुक्यातील युसूफ वडगाव, विडा, चिंचोलीमाळी, बनसारोळा, आडस, आष्टी तालुक्यातील धामणगाव, कडा, सुलेमान देवळा, टाकळसिंग, पाटोदा तालुक्यातील वाहली, डोंगरकिन्ही, नायगाव, अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव, घाटनांदूर, भावठाणा, उजनी, गेवराई तालुक्यातील चकलांबा, तलवाडा, मादळमोही, उमापूर, निपाणी जवळका, जातेगाव, बीड तालुक्यातील येळंबघाट, चौसाळा, नाळवंडी, लिंबागणेश, नवगण राजुरी, ताडसोन्ना, माजलगाव तालुक्यातील पात्रूड, टाकरवण, किट्टी आडगाव, गंगामसला, परळी तालुक्यातील धर्मापुरी, नागापूर तसेच वडवणी व शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बोअरवेल प्रस्तावित आहेत़