शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाणी प्रश्नाचा ‘कचरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:44 IST

शहरातील पाणी प्रश्नाने सोमवारी सर्वसाधारण सभेत पेट घेतला. तब्बल पाच तास वादळी चर्चा नगरसेवकांकडून करण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील पाणी प्रश्नाने सोमवारी सर्वसाधारण सभेत पेट घेतला. तब्बल पाच तास वादळी चर्चा नगरसेवकांकडून करण्यात आली. दूषित पाणी, वेळेवर पाणीपुरवठा नाही, अल्प दाबाने पाणीपुरवठा, मध्यरात्री होणारी पाण्याची पळवापळवी आदी अनेक मुद्यांचा ऊहापोह झाला. समांतर जलवाहिनीसाठी ही कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यात आल्याचा आरोपही अधिकाऱ्यांवर करण्यात आला. शेवटी महापौर नंदकुमार घोडेले यांनी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला. तीन दिवसांमध्ये सुधारणा न झाल्यास दोषी अधिका-यांवर कारवाईचे संकेतही त्यांनी दिले. ढीम्म प्रशासनामुळे कचराकोंडीप्रमाणे आणखी दोन महिने पाण्याचा प्रश्नही तापत राहणार हे निश्चित.सोमवारी सकाळी सर्वसाधारण सभा सुरू होताच सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणी प्रश्नावर हल्लाबोल केला. यामध्ये सिडको-हडको, चिकलठाणा आदी भागांतील नगरसेवक सर्वाधिक आघाडीवर होते. प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रशासनाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, नगरसेवकांनी त्यांनाही जुमानले नाही. गोंधळ वाढत गेल्याने दुपारी १२.३० वाजता सभा तहकूब करावी लागली. दुपारी १.५० वाजता परत सभेला सुरुवात झाली. पुन्हा नगरसेवकांनी पाणी प्रश्नावरून प्रशासनाची जोरदार कोंडी केली. शोभा बुरांडे, जयश्री कुलकर्णी, सीमा खरात, मनीषा मुंढे, ज्योती पिंजरकर, माधुरी अदवंत, संगीता वाघुले यांनी दूषित पाणी, अल्पवेळ पाणीपुरवठा आदी मुद्दे मांडले. सुरेखा सानप, मीना गायके, गजानन मनगटे, सीताराम सुरे यांनीही पाणी प्रश्नावर टीका केली. बापू घडामोडे यांनी या प्रश्नात मार्ग काढण्याचे आवाहन सभागृहाला केले. त्र्यंबक तुपे यांनी मनपाच्या टँकरमधून पाण्याची विक्री सुरू असल्याचा आरोप केला. पाच तासांच्या चर्चेनंतर शहरवासीयांना दिलासा देणारा कोणताही ठोस निर्णय झाला नाही.सेना-भाजपमध्ये वादनगरसेवक नितीन चित्ते यांनी सिडको-हडकोसाठी असलेल्या एक्स्प्रेस जलवाहिनीवरील क्रॉस कनेक्शनचा मुद्दा उकरून काढला. राजेंद्र जंजाळ यांनी त्वरित प्रत्युत्तर देऊन दहा वर्षांपासून हे क्रॉस कनेक्शन असल्याचे सांगून पाणी प्रश्नाला वेगळे वळण दिले.भाजपनेही याच मुद्यावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापौरांनी वेळीच हस्तक्षेप करून वादावर पडदा टाकला. पुंडलिकनगर पाण्याच्या टाकीतून ५०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्याच्या मुद्यावर माधुरी अदवंत यांनी भाष्य केले. त्यावरून मनगटे, मीना गायके यांनी कडाडून विरोध दर्शविला.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाPoliticsराजकारण