पैठण : जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याचा ओघ मंदावला असून, धरणात ४ तासाला ६६६६ क्युसेक्स पाणी दाखल होत आहे. शनिवारी धरणात ४५.१८ टक्के जलसाठा झाला आहे. धरण मात्र अजूनही १२ फूट रिकामेच आहे. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास वरील धरणांतून थोडाफार विसर्ग वाढविण्यात आल्याने धरणातील आवक खंडणार नसल्याचा दिलासा मिळाला आहे. पाऊस उघडल्याने वरील धरणांतून विसर्ग नाममात्र ठेवण्यात आला. यामुळे धरणातील आवक शुक्रवारपासून घटत होती. मुळा, भंडारदरा व ओझर वेअर मिळून ५३५ क्युसेक्स विसर्ग करण्यात येत आहे. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दारणा, गंगापूर व नांदूर-मधमेश्वर मिळून ५६४९ क्युसेक्स विसर्ग करण्यात आला. यामुळे जायकवाडीत आवक खंडणार नाही.शनिवारी सायंकाळी धरणाची पातळी १५१०.२८ फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा १७१९ द.ल.घ.मी. झाला असून, यापैकी ९८०.८९४ द.ल.घ.मी. उपयुक्त जलसाठा आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्याप १२ फूट पाणी लागणार आहे.
जायकवाडी धरणातील पाण्याची आवक मंदावली
By admin | Updated: September 14, 2014 00:22 IST
पैठण : जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याचा ओघ मंदावला असून, धरणात ४ तासाला ६६६६ क्युसेक्स पाणी दाखल होत आहे.
जायकवाडी धरणातील पाण्याची आवक मंदावली
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}