शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

पाणी वितरणाचे नियोजन कोलमडले

By admin | Updated: August 8, 2016 00:40 IST

उस्मानाबाद : उजनी पाणीपुरवठा योजनेतून दररोज सहा एमएलडी पाणीउपसा केला जात असला तरी शहरवासीयांना मात्र, अद्यापही टंचाईला तोंड द्यावे लागत आहे़

उस्मानाबाद : उजनी पाणीपुरवठा योजनेतून दररोज सहा एमएलडी पाणीउपसा केला जात असला तरी शहरवासीयांना मात्र, अद्यापही टंचाईला तोंड द्यावे लागत आहे़ पालिकेने आठवड्याला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले असले तरी हे नियोजन कागदावरच राहत असून, अनेक भागात १० ते १२ दिवसाला पाणीपुरवठा होत आहे़सव्वा लाख लोकसंख्येच्या उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तेरणा, रूईभर व सर्वात मोठी उजनी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे़ निम्मा पावसाळा लोटत आला तरी तेरणा व रूईभर प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे़ परिणामी शहराची पूर्ण मदार ही उजनी योजनेवर आहे़ मात्र, या योजनेला लागलेले गळतीचे ग्रहण अद्यापही कायम आहे़ एकीकडे पाकिकेकडून दिवसाकाठी जवळपास ६ एमएलडी पाणीउपसा केला जात असल्याचे सांगितले जात असले तरी मोठ्या प्रमाणात पाणी हे गळतीतून वाया जात आहे़ शहराला दिवसाकाठी ८ एमएलडी पाण्याची गरज आहे़ दिवसाकाठी पालिकेकडून होणारा पाणीउपसा, गळती होणारे पाणी पाहता किमान चार दिवसाला तरी शहराला पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे़ मात्र, सध्या शहराला ८ ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे़ विशेषत: हद्दवाढ भागातील अनेक ठिकाणी पाणीपुरवठ्याची पाईपलाईन नाही़ पालिकेकडून विविध विभागाला आठवड्याला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जात आहे़ असे असले तरी मागील तीन-चार महिन्यांपासून बिघडलेले पाणीपुरवठ्याचे नियोजन अद्यापही सुरळीत झाल्याचे दिसत नाही़ दरम्यान, सध्याचे उपलब्ध पाणी पाहता नगर पालिकेने पुढील आठवड्यापासून शहरातील दोन भागांना दररोज पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला आहे़ त्यादृष्टीने उजनी योजनेच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे़ प्रारंभी अर्धा तास व नंतर दररोज १५ ते २० मिनिटे पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे नगराध्यक्ष डोके यांनी सांगितले़