शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

निम्या तालुक्यांना क्रीडा संकुलाची प्रतीक्षा

By admin | Updated: January 8, 2015 00:59 IST

सोमनाथ खताळ , बीड ग्रामीण भागातील खेळाडूला चांगल्या सुविधा मिळाव्यात, ज्या त्या तालुक्यातील स्पर्धा तेथीलच तालुका क्रीडा संकुलात व्हाव्यात,

सोमनाथ खताळ , बीडग्रामीण भागातील खेळाडूला चांगल्या सुविधा मिळाव्यात, ज्या त्या तालुक्यातील स्पर्धा तेथीलच तालुका क्रीडा संकुलात व्हाव्यात, या उद्देशाने प्रत्येक तालुक्यात तालुकास्तरीय क्रीडा संकुल असावे, असे क्रीडा कार्यालयाचे धोरण आहे. मात्र येथील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांना अद्यापही क्रीडा संकुलासाठी जागाच उपलब्ध झालेली नाही. तर आहे त्या ठिकाणचे क्रीडा संकुल म्हणजे ‘असुन अडचण नसून’ खोळंबा अशी स्थिती आहे.जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयांतर्गत विविध विकास कामे करण्यात येतात. यासाठी करोडो रूपयांचा निधीही येतो. मात्र आलेला निधी वेळच्यावेळी खर्च होत नसल्याने तो निधी आहे तसा परत जातो. मागील दोन महिन्यापासून जिल्हा क्रीडा संकुलाचे कामही सुरू झाले आहे, मात्र तालुक्याच्या ठिकाणी आजही योग्य असे क्रीडा संकुल उपलब्ध नाहीत. गेवराई आणि शिरूरकासार येथील क्रीडा संकुलाच्या कामाला सुरूवात झाली होती, मात्र अर्ध्यावरच गुत्तेदारांनी हे काम सोडले. या कामासाठी पहिला हप्ता २५ लाख रूपये याप्रमाणे आला असल्याचे सुत्रांनी सांगितले.शिरूर कासार येथील क्रीडा संकुलाच्या कामाल सुरूवात झाली होती. येथे बॅडमिंटन हॉलचे कामही झाले असल्याचे सांगण्यात आले. मात्र गुत्तेदाराने मधातच काम सोडून दिले, त्यामुळे या संकुलाचे कामही आज अर्धवट स्थितीत आहे. आता तर वनविभाग व क्रीडा कार्यालय यांच्यात जागेसाठी वाद सरू असल्याची माहितीही सुत्रांनी सांगितली.पाटोदा येथेही जागा उपलब्ध होत नव्हती. आता कशीतरी जागा उपलब्ध झाली असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी निलीमा आडसुळ यांनी सांगितले. मात्र या कामाला अद्यापही सुरूवात का झाली नाही? याचे उत्तर त्यांना देता आले नाही.गेवराई येथील क्रीडा संकुलाचे टेंडर काढण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात येथेही कामाला सुरूवात झालेली नाही. धारूर येथेही क्रीडा संकुल आहे, मात्र याची दुरवस्था झाली आहे. अंबाजोगाई येथील क्रीडा संकुलाच्या कामाला सुरूवात झाली असून लेवलींगचे काम सुरू असल्याचे आडसुळ म्हणाल्या.जागा पाहणे सुरू- आडसुळज्या तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी जागा पाहणे सुरू आहे. यातील काही तालुक्याच्या ठिकाणी जागा मिळाली आहे, परंतू फिक्स झाले नसल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी निलीमा आडसुळ यांनी ‘लोकमतशी’ बोलताना सांगितले.बीड, अंबाजोगाई, गेवराई, शिरूरकासार, धारूर येथे संकुलासाठी जागा उपलब्ध आहे. मात्र काम बंद आहे. कसल्याच प्रकारचे काम व्यवस्थीत होत नसल्याची ओरड आहे.तालुका क्रीडा समितीच्या वतीने हे क्रीडा संकुल उभारण्यात येतात. एका क्रीडा संकुलासाठी एक कोटी रूपयाचा निधी उपलब्ध होतो. मात्र निधी उपलब्ध असूनही जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे आणि ढिसाळ नियोजनामुळे कुठल्याच क्रीडा संकुलाचे काम व्यवस्थीतपणे सुरू नाही.