शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांपासून इमारतीची प्रतीक्षा

By admin | Updated: August 3, 2014 01:13 IST

सेनगाव : तालुकास्तरावर २००८ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या सेनगाव येथील प्रथमसत्र दिवाणी व फौजदारी न्यायालयाला चार वर्षानंतरही न्याय मिळालेला नाही.

सेनगाव : तालुकास्तरावर २००८ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या सेनगाव येथील प्रथमसत्र दिवाणी व फौजदारी न्यायालयाला चार वर्षानंतरही न्याय मिळालेला नाही. न्यायालयाकरिता स्वतंत्र इमारत उभी राहू शकली नसल्याने न्यायालयाचे कामकाज भाड्याच्या जागेतच चालू आहे.चार वर्षांपूर्वी हिंंगोली जिल्ह्यात सेनगाव व औंढा नागनाथ या दोन तालुक्यांच्या ठिकाणी तालुकास्तरीय न्यायालयाची स्थापना करण्यात आली. तात्पुरत्या स्वरुपात न्यायालयाचे कामकाज किरायाच्या जागेत सुरू करण्यात आले होते; परंतु सेनगावबरोबर कार्यान्वित झालेल्या औंढा येथील न्यायालयाला आजघडीला स्वतंत्र इमारत मिळालेली नाही. काही दिवसांपूर्वी न्यायालयाचा दुसरा कक्षही सुरू झालेला आहे. असे असताना सेनगाव न्यायालयाच्या पदरी मात्र निराशा आली आहे. अद्याप न्यायालयाच्या इमारतीकरिता पाच एकर जमीन मिळाली नसल्याने इमारतीचा प्रश्न रखडला आहे. परभणी न्यायिक जिल्हा असल्याने स्थानिक स्तरावर निर्णय होत नाही. सध्या वापरात असलेली इमारत गैरसोयीची असून पक्षकारांना बसण्यासाठी न्यायालयात पुरेशी जागाही नाही. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी अडचणीत बसावे लागते. पक्षकार, वकिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने मोठी अडचण आहे. तालुका वकील संघाचा वतीने इमारतीच्या मागणीकरिता सातत्याने पाठपुरावा सुरू आहे; परंतु प्रतिसाद मिळत नसल्याने हा प्रश्न कायम आहे. याकडे जबाबदार अधिकारी, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)भाड्याच्या जागेत कामकाज सुरू हिंगोली जिल्ह्यात सेनगाव व औंढा नागनाथ येथे २००८ साली तालुकास्तरावरील न्यायालये स्थापन करण्यात आली.औंढा नागनाथ येथे स्वंतत्र इमारत उभारण्यात आली. पण सेनगावातील प्रश्न काही सुटलेला नाही.तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.केशव भालेराव यांनी अनेकवेळा न्यायालयाच्या इमारतीसंदर्भात मागणी केली आहे.परभणी येथे निर्णय होत असल्याने याबाबत स्थानिक स्तरावर कार्यवाही नाही न्यायालयाचा इमारतीकरिता जागेचा शोध घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोपविण्यात आली आहे. परंतु या यंत्रणेने गंभीरतेने जागेचा शोध घेतला नसल्याने इमारतीची समस्या कायम आहे. सद्य:स्थितीत न्यायालयाचा कारभार कार्यरत असलेली इमारत अपुरी पडत आहे. एकंदर अडचणीत न्यायालयाचे कामकाज चालू असून स्वतंत्र इमारतीचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात येत आहे.