शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

जायकवाडी जलाशयात महाकाय मगरीचे दर्शन; शेतकरी, मच्छीमारांमध्ये घबराहट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 19:40 IST

महाकाय मगरीचे  दर्शन झाल्याने जलाशयाच्या काठावरील शेतकरी व मच्छीमारांची भितीने गाळन उडाली आहे.

ठळक मुद्देनाथसागरात अनेक मगर असण्याची शक्यतादोन वर्षानंतर पुन्हा मगर दर्शन

पैठण : जायकवाडी धरणाच्या जलाशयात आज सकाळी महाकाय मगरीचे दर्शन धरणावर काम करणाऱ्या तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांना झाले. महाकाय मगरीचे  दर्शन झाल्याने जलाशयाच्या काठावरील शेतकरी व मच्छीमारांची भितीने गाळन उडाली आहे.

दोन वर्षाच्या कालावधी नंतर पुन्हा मगर प्रकट झाल्याने नाथसागर जलाशयात मगरीचे वास्तव्य असल्याचे अधोरेखित झाले आहे. जायकवाडी धरणावर तांत्रिक विभागामार्फत नियमित कामे सुरू असून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरवाजा परिसरात आज सकाळी ११ वाजेच्या दरम्यान जलाशयात मगरीचे दर्शन झाले. यानंतर पुन्हा धरण नियंत्रण कक्षाच्या पाठिमागे धरणावरील काही कर्मचाऱ्यांना मगर दिसली.

दोन वर्षानंतर पुन्हा मगर दर्शनसन २०१५ ला परभणी जिल्हात सापडलेली मगर वनखात्याने जायकवाडी धरणात आणून सोडली होती. वनखात्याच्या या कृतीस जायकवाडी प्रशासनासह स्थानिक नागरिकांनी मोठा विरोध दर्शविला होता.  या नंतर सन २०१७ ला ८ नोहेंंबर  रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास महाकाय मगर पैठण ते दक्षिण जायकवाडी रस्त्यावर फिरताना आढळून आली होती.पैठण येथील दिलीप सोनटक्के, जालिंदर आडसूळ, राजू गायकवाड, साहेबा ढवळे आतिष गायकवाड आशिष मापारी या तरूणांनी मोठे धाडस करीत या मगरीस जेरबंद करून वन खात्याच्या हवाली केले होते.  वनखात्याने  दोन दिवसानंतर मगरीस नागपूर येथील पेंच अभयारण्यात  हलविले होते. या नंतर मगर नाथसागरात प्रकट झाली नाही दरम्यान बुधवारी परत एकदा दोन वर्षानंतर मगरीचे दर्शन झाले आहे.

नाथसागरात अनेक मगर असण्याची शक्यतानाथ सागरात सन २००६ च्या महापुरानंतर बँकवाटर परिसरात सातत्याने मगर दर्शन होत आहे. २००६ मध्ये मच्छीमारांच्या जाळ्यात मगरीचे पिल्ले आले होते. हे पिल्ले पुन्हा वनखात्याने नाथसागरात सोडले होते. साधारणपणे गोड्या पाण्यातील मगर नोहेंबर महिण्यात जलाशया बाहेर येऊन अंडे देते. एका वेळी  २० ते २५ अंडे मगर देते. नोहेबर २०१७ ला जायकवाडी धरणाच्या मत्सबीज केंद्राच्या निर्जन भागातून ही मगर बाहेर पडताना नागरिकांच्या निदर्शनास आली होती. या मुळे या मगरीने या भागात अंडे दिले असावेत असा अंदाज वर्तविण्यात येत होता. या शिवाय २००६ च्या महापुरा प्रमाणेच यंदाच्या महापुरात अनेक मगरी जायकवाडी धरणात पुरासोबत आल्या असेही काही जणांचे म्हणने आहे. या मुळे नाथसागरात अनेक मगरी असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीFarmerशेतकरी